Tuesday, April 30, 2024

Latest Posts

मतांसाठी श्रीरामाचा गैरवापर, Nitin Gadkari यांची उमेदवारी रद्द करा, Congress चे Atul Londhe यांची मागणी

मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी भगवान श्रीरामाची पोस्टर्स वापरून आचारसंहितेचा भंग केल्याने नितीन गडकरी यांची उमेदवारी रद्द करा. अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) अनुषंगाने देशभर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या प्रचारसभांचा धडाका लागला आहे. पक्षाच्या आणि नेत्यांच्या प्रचारासाठी रस्त्यांवर आणि चौकाचौकात मोठमोठे होर्डिंग आणि पोस्टर्स लावले जात आहेत. अश्यातच, पोस्टर्स लावण्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे (Congress) मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (atul Londhe) यांनी निवडणूक आयोगाला (Election Commission) पत्र लिहीत नागपूर लोकसभा मतदारसंघाचे (Nagpur Loksabha Constituency) भाजपचे (BJP) उमेदवार नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली आहे.

राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहीत अतुल लोंढे म्हणाले,”भारतीय जनता पक्ष सर्व कायदे धाब्यावर बसवून सातत्याने आचारसंहितेचा भंग करत आहे. भारतीय जनता पक्षाचे नागपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नितीन गडकरी व आमदार मोहन मते यांनी आदर्श आचारसंहितेचे उघडपणे उल्लंघन केले आहे. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी भगवान श्रीरामाची पोस्टर्स वापरून आचारसंहितेचा भंग केल्याने नितीन गडकरी यांची उमेदवारी रद्द करा.” अशी मागणी त्यांनी केली.

राज्य निवडणुक अधिकारी यांनी लिहलेल्या पत्रात अतुल लोंढे म्हणतात की, “नितीन गडकरी यांनी प्रचार मोहिमेमध्ये धर्माचा आधार घेत मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. भगवान श्रीराम दर्शविणारी पोस्टर्स वापरली गेली आहेत, ज्यामुळे निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन झाले आहे. भाजपाचा हा प्रकार अनैतिक असून धार्मिक मतदारांचे ध्रुवीकरण करणारा आहे. भाजपाने या पोस्टर्सचा वापर काँग्रेस पक्षाविरुद्ध द्वेष पसरवण्यासाठीही केला गेला आहे. भाजपा व नितीन गडकरी यांनी केलेला प्रकार आदर्श आचार संहितेचे उल्लंघन करणारा असून निवडणुक आयागाने तात्काळ त्यांची उमेदवारी रद्द करणे आणि भाजपवर योग्य दंड ठोठावण्यासह त्वरित कारवाई करावी.”

निवडणूक आयोगाची भाजपवर कारवाई का नाही – अतुल लोंढे

“भारतीय जनता पक्षाचे सर्व नियम धुडकावत असताना निवडणुक आयोग सत्ताधारी भाजपावर कसलीच कारवाई करत नाही. सरकारी यंत्रणा भाजपाच्या कठपुतळ्या बाहुल्या झाल्या आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हेलिकॉप्टरची तपासणी केली पण भाजपा नेत्यांवर कारवाई करण्यास घाबरते यावरून निवडणुका पारदर्शी घेण्याच्या जबाबदारीपासून निवडणुक आयोगा दूर पळत असून केवळ विरोधकांसाठीच आचारसंहितेचे नियम आहेत का,” असा संतप्त सवालही लोंढे यांनी विचारला आहे.

हे ही वाचा:

चारशे पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे दोनशेचे वांदे, Congress प्रवक्ते Atul Londhe यांचा BJP वर हल्लाबोल

Udayanraje Bhosale दिल्लीच्या तख्तासमोर झुकले, Jitendra Awhad यांची टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss