ICSE व ISC बोर्डाचा निकाल जाहीर, महाराष्ट्र राज्य बोर्डाचा HSC व SSC चा निकाल कधी ?

नुकतेच काल ISC व ICSE बोर्डाचे निकाल जाहीर झाले असून महाराष्ट्र राज्य बोर्डाचे दहावी व बारावीचे निकालही जाहीर होण्याची शक्यता आहे.

ICSE व ISC बोर्डाचा निकाल जाहीर, महाराष्ट्र राज्य बोर्डाचा HSC व SSC चा निकाल कधी ?

फेब्रुवारी, मार्च महिन्यामध्ये दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा झाल्या होत्या. काल (सोमवार, ६ मे) ICSE आणि ISC बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या झालेल्या परीक्षेत दहावीच्या २,६९५ शाळांपैकी ८२.४८% म्हणजेच २,२२३ शाळांचा निकाल १००% लागला आहे. तर ISC बोर्डामध्ये १,३६६ शाळांपैकी ६६.१८% म्हणजेच ९०४ शाळांचा निकाल हा १००% लागला आहे. जाहीर झालेल्या निकालामध्ये दहावी आणि बारावी दोन्हींच्या निकालामध्ये मुलींचा दबदबा दिसून येत आहे. काल जाहीर झालेल्या निकालानंतर देशात CBSC तर राज्यात HSC व SSC बोर्डाच्या विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता लागली आहे. तरी आता निकाल लावण्याचे मोठे आव्हान शिक्षकांसमोर येऊन उभा राहिले आहे.

ICSC व ISC बोर्डाच्या निकालानंतर आता HSC आणि SSC बोर्डाचा निकाल कधी जाहीर होणार याकडे विद्यार्थ्यांची उत्सुकता लागली असून मे महिन्यामध्येच महाराष्ट्र राज्याचा HSC आणि SSC बोर्डाचा निकाल जाहीर होणार आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दहावीचा तर दुसऱ्या आठवड्यात बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. दरवर्षीप्रमाणे निकालाच्या एक दिवस आधी बोर्ड अधिकृतपणे निकालाची तारीख जाहीर करेल. maharesult.nic.in या वेबसाईट वर पाहता येईल याचसोबत CBSC बोर्डाचा निकाल २० मे नंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. CBSC बोर्डाची दहावीची परीक्षा देखील १५ फेब्रुवारी ते १२ मार्च तर बारावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते २ एप्रिल दरम्यान झाली होती. तिन्ही बोर्डाचे निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीची प्रवेशप्रक्रिया चालू होईल.

हे ही वाचा:

भारतीय कॅलिफोर्निआचा राजकारणामुळे झालाय बट्ट्याबोळ!

Exclusive CM Eknath Shinde: कॉंग्रेसचा हात पाकिस्तान के साथ……

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version