Saturday, May 18, 2024

Latest Posts

शस्त्रक्रियेमुळे अभिनेत्रीचा चेहरा झाला असा

अभिनेत्रीचा चेहरा चुकीच्या सर्जरीमुळे विचित्र झाला आहे. या अभिनेत्रीचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

सेलेब्रिटी असो किंवा सामान्य व्यक्ती प्रत्येकासाठी चेहरा खूप महत्त्वाचा आहे. चेहऱ्यामुळेच व्यक्तीला खऱ्या अर्थाने ओळख मिळत असते. मात्र, फिल्म  स्टार्ससाठी चेहरा आणि सौंदर्य किती महत्त्वाचे असते हे आपल्याला सर्वांना महिती आहे. पण एका अभिनेत्रीचा चेहरा चुकीच्या सर्जरीमुळे विचित्र झाला आहे. या अभिनेत्रीचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कन्नड अभिनेत्री स्वाती सतीश हिचा चेहरा रूट कॅनल सर्जरीमुळे विचित्र झाला आहे. चुकीच्या उपचार पद्धतीमुळे स्वातीचा चेहरा खूपच खराब झाला  असून तिचा गाल आणि डोळे पूर्ण पणे सुजले आहे. तिला तुम्ही ओळखूही शकत नाहीत. आता सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे स्वातीने घराबाहेर पडणं देखील मुश्कील झालं आहे. अभिनेत्रीच्या चेहऱ्याची अवस्था पाहून रुट कॅनलमुळे तिचा असा अवतार झाला आहे, यावर कोणाचा विश्वास देखील बसणार नाही.
माहितीनुसारनुसार, स्वाती ही मूळ बंगळुरू ची  आहे. तिने काही दिवसांपूर्वी रूट कॅनल केलं होतं. त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर सूज आली. नंतर तर तिला असाह्य वेदनाही झाल्या. ती पुन्हा डॉक्टरांकडे गेली. डॉक्टर म्हणाले, पुढील 2-3 दिवसांत सूज उतरेल आणि तिचा चेहरा आधीप्रमाणे होईल. परंतु तीन आठवडे उलटले तरी स्वातीचा चेहरा आहे तसाच आहे.
स्वातीचा चेहरा मात्र आणखीन विचित्र झाला आहे. तिला ओळखणे देखील कठीण झालं आहे. या सगळ्या प्रकारामुळे स्वातीला मोठा मन:स्ताप सहन करावा लागत आहे.स्वाती एफआयआर’ आणि ‘6 टू 6’ चित्रपटात दिसली होती. तर आता स्वातीचे चाहते स्वातीला सोशल मीडियाद्वारे सांत्वना देत आहेत.

Latest Posts

Don't Miss