Saturday, May 18, 2024

Latest Posts

‘कॉफी विथ करण’ शो मध्ये आलियाने सांगितला इब्राहिमचा ‘तो’ किस्सा

शोच्या पहिल्याच भागात आलियाने भट्ट (Alia Bhatt) ने तिचा आवडता को स्टार रणवीर सिंगसोबत (Ranveer Singh) शो मध्ये हजेरी लावली होती.

मुंबई: अलीकडेच करण जोहरचा प्रसिद्ध शो ‘कॉफी विथ करण’च्या सातव्या सीझन ला सुरूवात झाली. शोच्या पहिल्याच भागात आलियाने भट्ट (Alia Bhatt) ने तिचा आवडता को स्टार रणवीर सिंगसोबत (Ranveer Singh) शो मध्ये हजेरी लावली होती. शो मध्ये आलिया आणि रणवीर च्या वैयक्तिक जीवनाबद्दल चर्चा करण्यात आली. यावेळी आलिया ने अनेक खुलासे केले. आलिया ने सैफ अली खान चा मुलगा इब्राहिम अली खान बद्दलचा एक मजेदार किस्सा शेअर केला. या व्यतिरिक्त करण ने तिला अनेक प्रश्न विचारले.
आलिया भट्ट अभिनित हिट ठरलेल्या गंगूबाई काठीयावाडी चित्रपटाबद्दल करण ने तिला एक प्रश्न विचारला. गंगुबाई पाहिल्या नंतर तिला मिळालेल्या चांगल्या प्रतिक्रियेबद्दल करण ने तिला विचारले. तेव्हा तिने इब्राहिम अली खान चे नाव घेतले. पुढे तिने त्याने पाठवलेला मेसेज वाचून ही दाखवला. इब्राहिम ने लिहिले, “तुला मेसेज करण्यासाठी मला वेळ काढावा लागला. गंगुबाई मधील तुझा अभिनय बघून मला विश्वासच बसला नाही की ही तीच मुलगी जिच्याकडून मी सेटवर काही गोष्टी शिकत असतो. तु खरंच खूप हुशार आहेस. गंगुच्या भूमिकेत तु खुप सुंदर दिसली आहेस. तु कोणतीही भूमिका उत्तमरित्या पार पाडतेस. एखाद्या भांड्यात पाण्याने आकार घ्यावा तशी तु भूमिकेशी एकरूप होतेस. खूप छान, देशातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री” असा मेसेज इब्राहिम ने आलिया ला केला. हा मेसेज वाचून झाल्यावर इब्राहिम खूप क्यूट असल्याचं आलिया म्हणाली. हा मेसेज वाचून झाल्यावर करण आणि रणवीर जोरजोरात हसू लागले.
‘कॉफी विथ करण’च्या सातव्या सीझन मधील पाहिल्याच भागात आलिया आणि रणवीर ने सुरवातीलाच हटके ओपनिंग केली आहे. दोघांनीही आपल्या पर्सनल आणि लग्नानंतरच्या आयुष्याबद्दल बद्दल अनेक किस्से शेअर केले आहेत. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट लवकरच करण जोहर च्या आगामी ‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’ मध्ये दिसणार आहेत.

Latest Posts

Don't Miss