Monday, May 20, 2024

Latest Posts

Disha Patani ने केली हटके ड्रेसिंग , पण पुन्हा होतेय जोरदार ट्रोल

गणपती बाप्पाच्या आगमनामुळे राज्यभरात उत्साह निर्माण झाला आहे. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत.

गणपती बाप्पाच्या आगमनामुळे राज्यभरात उत्साह निर्माण झाला आहे. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. त्याच्या मुंबईतल्या अँटिलिया या घरात बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे. अंबानी यांच्या घरी प्रत्येक सण मोठ्या धुमधड्याक्यात पार पडतात. त्यांच्या घरी बॉलिवूडपासून क्रिकेट विश्वापर्यंत अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतात. गणपतीच्या आगमनानंतर त्यांच्या घरी बॉलिवूड, राजकारण आणि क्रिकेट विश्वातील सेलिब्रिटींनी दर्शनासाठी हजेरी लावली. यावेळी सेलिब्रिटी पारंपरिक पोशाखात गेले होते.

रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, सारा अली खान, जान्हवी कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी यांसारखे बरेच सेलिब्रिटी तिथे उपस्थित होते. पापाराझींनी या सेलिब्रिटींचे व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. यावेळी अभिनेत्री दिशा पटानी खूप ट्रोल केले जात आहे. अंबानी यांच्या घरी दर्शनासाठी दिशा पटानी तिची खास मैत्रीण आणि प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉयसोबत गेली होती. पण दिशाचा मॉडर्न अंदाज पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. मौनीने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. तर दिशाने सोनेरी रंगाची साडी नेसली होती. या साडीवरील दिशाच्या ब्लाऊजने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतले आहे. साडीवरील हा बोल्ड अंदाज नेटकऱ्यांना पसंत पडला नाही. त्यावरून अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे. ‘इथे केल्विन क्लेइनसाठी शूट होत नाहीये, गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी चालली आहेस’, अशा शब्दांत नेटकाऱ्यानी तिला सुनावले आहे. तर ‘साडीच्या सुंदर लूकला अश्लील कसं करायचं हे फक्त दिशालाच माहीत आहे’, असं दुसऱ्याने म्हंटले आहे. ‘ही पूजा करायला आली आहे आणि असे कपडे का परिधान केले आहेत’, असाही प्रश्न नेटकऱ्यांनी केला आहेत. दिक्षा ही तिचा कपड्यामुळे नेहमीच चर्चेत असते.

दिशाने याआधी देखील वाराणसीत गंगा आरती करताना ज्या प्रकारचे कपडे घातले होते. त्यामुळे तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात होते. गंगा आरती करताना दिशाने क्रॉप टॉप आणि त्यावर शॉल घेतली होती. ‘दिशाला कोणीतरी योग्य दिशा दाखवा’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तिला सुनावलं होतं. तिच्या कपड्यांमुळे तिला नेहमीच नेटकरी ट्रोल करत असतात.

Latest Posts

Don't Miss