इतका संघर्षमय होता ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा प्रवास

इतका संघर्षमय होता ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा प्रवास

अभिनय क्षेत्रामध्ये अनेक कलाकारांना मेहनत करावी लागते. अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) हिला सुद्धा खूप मेहनत करावी लागली. ‘बनू मैं तेरी दुल्हन’ या मालिकेतून घरा-घरात पोहचलेली अभिनेत्री दिव्यांका भोपाळची राहणारी होती. सर्वसामान्य कुटुंबात ती लहानाची मोठी झाली. दिव्यांकाचे वडील फार्मासिस्ट आणि आई गृहिणी होती. मध्यवर्ती कुटुंबातले असल्यामुळे तिला आणि तिच्या बहिणीला नेहमी अभ्यासाकडे लक्ष दे, असे आई वडील नेहमी तिला सांगत होते.

दिव्यांकाने चित्रपट क्षेत्रामध्ये तिचा येण्याचा कधीच विचार नव्हता केला. दिव्यांकाला गिर्यारोहक व्हायचं होतं. दिव्यांकाने नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंगमधून गिर्यारोहणाचा कोर्स पण केला होता. दिव्यांकाने ऑल इंडिया रेडिओवर अँकरचे काम केले होते. त्यानंतर अँकरमध्ये करिअर करण्याचे ठरवले. त्यानंतर तिने अनेक शोमध्ये काम केले. दिव्यांकाने दूरदर्शनचा लोकप्रिय शो ‘आकाशवाणी’ होस्ट केला होता. यानंतर तिने मालिकांमध्ये काम करायला सुरवात केली. ‘दिल चाहते मोर’ आणि ‘विरासत’ या मालिकांमध्ये तिने छोटी भूमिका साकारल्या होत्या. दिव्यांका शोमध्ये काम करत असताना तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागायचे. कधी कधी तर तिच्याकडे पैसेसुद्धा नसायचे. पैसे कमावण्यासाठी तिला टूथपेस्टचे बॉक्स साठून आणि भंगार पण विकावे लागायचे. ‘ये हैं मोहब्बतें’ मालिकेचा टीआरपी वाढला आणि दिव्यांका प्रसिद्ध झाली. त्यांनतर तिला अनके मालिकांसाठी ऑफर येण्यास सुरुवात झाली. ‘बनू मैं तेरी दुल्हन’ या मालिकेत शरद मल्होत्रा सोबत दिव्यांकाने काम केले होते. मालिकेदरम्यान दिव्यांका आणि शरद रिलेशनमध्ये होते. काही कारणांमुळे त्यांचे ब्रेकअप झालं. ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेत विवेक दहियासोबत तिने काम केले. ८ जुलै २०१६ रोजी विवेक आणि दिव्यांकाने लग्न केले.

 

हे ही वाचा:

Ananya panday बद्दल मोठा खुलासा, काय म्हणाले Chunky Panday? दही खाण्याचे फायदे तर आहेतच पण तोटे काय आहेत?

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version