Saturday, May 4, 2024

Latest Posts

Ananya panday बद्दल मोठा खुलासा, काय म्हणाले Chunky Panday?

अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) आणि अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत (Aditya Roy Kapoor) यांच्या अफेअर्सची चर्चा सगळीकडे सुरु आहे. बऱ्याचवेळा हे दोघे फिरायला जाताना किंवा डेटवर जाताना एकत्र दिसले आहेत. या दरम्यान अनन्याचे वडील चंकी पांडे (Chunky Panday) यांनी लेकीच्या नात्याबद्दल त्यांचे मत मांडले आहे.

एका मुलाखती दरम्यान त्यांना लेकीबद्दल म्हणजेच अनन्या बद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. बऱ्याचवेळा अनन्या आदित्यबद्दल मुलाखतीमध्ये त्याचा उल्लेख करत असते. माझ्या मते हे योग्य आहे. माझ्यापेक्षा जास्त ती पैसे कमावत आहे. त्यामुळे हा तिचा निर्णय आहे. तिला सगळ्या गोष्टींचे स्वतंत्र आहे. २५ वर्षाच्या मुलीला काय कर आणि काय करू नको हे सांगायची मी हिंमत कशी करू शकतो, असे त्यांनी सांगितले आहे. त्या मुलाखती दरम्यान अनन्याच्या इंटिमेट सीनवर प्रश्न विचारण्यात आले होते. अनन्याच्या इंटिमेट सीन्सबद्दल तुम्हाला काही आक्षेप आहे का? मला याबद्दल  काहीच अडचण नाही आहे. मला काहीही नुकसान नाही हे हॉलिवूड चित्रपटात होतच राहतं. तुम्हाला या सर्व गोष्टींचा स्वीकार करावाच लागेल असे त्यांनी म्हटले आहे.

माझ्या दोन्ही मुली माझ्या बायकोच्या म्हणजेच त्यांच्या आईच्या जास्त जवळ आहेत. त्यांना जर काही हवं असेल तर त्या मला कॉल करतात. पण दोघी आईला दररोज कॉल करतात. कोणत्याही सल्ला हवा असेल तर मी त्यांना नेहमी मदत करतो. चित्रपटाची निवड करताना आमचे वाद पण होतात, असे देखील सांगितले आहे.

हे ही वाचा:

प्रेग्नेंसी नंतर Alia Bhatt घेतेय ‘ही’ थेरपी

RR vs MI, मुंबई इंडियन्सचा राजस्थान रॉयल्सकडून सलग दुसऱ्यांदा पराभव

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss