Saturday, May 4, 2024

Latest Posts

दही खाण्याचे फायदे तर आहेतच पण तोटे काय आहेत?

बहुतेकजण रोजच्या आहारात दहीचा समावेश करत असतात. थंड आणि मधूर दही कोणाला आवडत नाही? दही कशा सोबतही खाल्ली पदार्थाची चव वाढवतेच. दहीमध्ये अनेक पोषक घटक असतात. रोजच्या जेवणात दही खाणे आवश्यक आहे. यामुळे शरीरातील काही समस्या दूर होतात. आजकाल सगळीकडे पॅकबंद दही मिळते. पूर्वीच्या काळी दही मातीच्या भांड्यात घरातच बनवलेलं असायचं. मंद, गोड, आंबट-गोड, आंबट व अत्यंत आंबट असे हे पाच प्रकार आहेत. दही खाल्ल्याने शरीराला खूप फायदे होतात. पण चुकीच्या पद्धतीने दही खाल्ल्यावर आजार होतात. चला तर जाणून घेऊयात काय फायदे आणि नुकसान होतात.

  • अत्यंत आंबट दहीचे सेवन केल्यास पित्ताचा आणि अपचनाचा त्रास होतो.
  • गोड, आंबट गोड दही खाल्याने भूक वाढते आणि पचनशक्ती सुधारते.
  • केसांवर आणि चेहऱ्यावर दही लावल्यास चांगले परिणाम दिसून येतात.
  • डोक्यातील कोंडा घालवण्यासाठी दहीचा वापर केल्यास कोंडयाची समस्या दूर होते. आणि केसांना छान चमक येते.
  • दह्यामध्ये कॅल्शियम आणि फॅटचे भरपूर प्रमाणात असते. यामुळे हाडे मजबूत राहतात.
  • दही खाल्याने झोपेच्या समस्या दूर होतात.
  • रात्रीच्यावेळी दही खाऊ नये. यामुळे कफाची समस्या वाढते.
  • फळांसोबत दही कधीही खाऊ नये. यामुळे शरीरावर ऍलर्जी होते.
  • मांस मटणाचे सेवन केल्यानंतर दही कधीच खाऊ नये. यामुळे शरीरात विषारी पदार्थ तयार होतात.

हे ही वाचा:

कच्च्या कैरीपासून बनवलेला ‘हा’ पदार्थ नक्की ट्राय करा

प्रेग्नेंसी नंतर Alia Bhatt घेतेय ‘ही’ थेरपी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss