Sunday, May 19, 2024

Latest Posts

रणबीरच्या ‘ॲनिमल’ची पहिल्याच दिवशी ‘इतक्या’ कोटींची बंपर कमाई

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरचा बहुचर्चित व बहुप्रतिक्षीत ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित करणअयात आला आहे

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरचा बहुचर्चित व बहुप्रतिक्षीत ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित करणअयात आला आहे.या चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबतची प्रचंड उत्सुकता होती. प्रेक्षकांची तिच उत्सुकता चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळाली होती. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली होती.दरम्यान चित्रपट प्रदर्शित होण्या आधिचं  ‘अ‍ॅनिमल’चं अॅडव्हान्स बुकिंग जोरदार झालं होतं. रिलीजच्या पहिल्याच दिवशी वर्षाभरातील मोठी ओपनिंग करणारा ‘अ‍ॅनिमल’ हा तिसरा चित्रपट ठरला आहे.

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने फक्त भारतातच नाही, तर परदेशातही जबरदस्त कमाई केली आहे. चित्रपटाच्या सुरुवातीच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. ‘सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, भारतात या चित्रपटाने तब्बल ६१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यापैकी ५०.५० कोटी फक्त हिंदी भाषेत कमावले आहेत. तर १० कोटी रुपये तेलुगू भाषेत कमावले आहेत. उर्वरित कमाई ही कन्नड व मल्याळम भाषेतली आहे. चित्रपटाच्या टीमने अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही.

‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट जगभरात पहिल्याच दिवशी १०० कोटी रुपये कमावण्यात यशस्वी ठरला आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवर १० पैकी ८ रेटिंग मिळाले आहे. लोकांची क्रेझ पाहता शनिवार व रविवार या वीकेंडच्या दिवसांमध्ये चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ होऊ शकते, असं दिसत आहे.

‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी त्याने १०० कोटींचा आकडा पार केला आहे.तर यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ने पहिल्या दिवशी भारतात ५७ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाने जगभरात १०४.८० कोटींची कमाई केली होती. सनी देओलच्या ‘गदर २’ ने, पहिल्या दिवशी देशभरात ४०.१ कोटींची कमाई झाली होती. तर शाहरुखच्या मागील ‘जवान’ या चित्रपटाने देशभरात पहिल्याच दिवशी ७५ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटातील रणबीरच्या लूकने सर्वांनाच चकित केले आहे. अभिनेत्याने याआधी कधीही अशा प्रकारची भूमिका साकरली नव्हती. बॉबी देओल हा देखील या चित्रपटाचे महत्त्वाचे आकर्षण होते. संदीप रेड्डी वांगा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

दरम्यान, हा चित्रपट वडिल-मुलाच्या नात्यावर आधारित आहे. यात रणबीर कपूरने मुलाची तर अनिल कपूर यांनी त्याच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. त्याशिवाय यात बॉबी देओल रश्मिका मंदान्ना, तृप्ती डिमरी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

हे ही वाचा:

POLITICS: MNS अध्यक्षांनी घेतली CM SHINDE यांची भेट

सीबीएसईने घेतला मोठा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss