शुभमंगल सावधान; प्रेमाची गोष्ट मालिकेत सागर-मुक्ताचा विवाहसोहळा

 छोट्या पडद्यावरील प्रेनाची गोष्ट ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे.मालिकेतील कलाकारांवर देखील प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत

शुभमंगल सावधान; प्रेमाची गोष्ट मालिकेत सागर-मुक्ताचा विवाहसोहळा

 छोट्या पडद्यावरील प्रेनाची गोष्ट ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे.मालिकेतील कलाकारांवर देखील प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत,तर गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता मालिका म्हंटलं तर ट्विस्ट येणारच.दरम्यान आता प्रेक्षक ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत तो दिवस आता जवळ आला आहे.कारण मालिकेत लग्न समारंभ खुप खेचला गेला आहे,लग्नाआधिच्या सर्वविधी यात दाखवण्यात आल्या आहेत.त्यामुळे आता मुक्ता-सागरच लग्न अखेर कधी पार पडणार याची प्रेक्षक वाट पाहत होते.तर आता मालिकेत लवकरच मुक्ता आणि सागर लग्नबंधनात अडकणार आहेत.

‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत आजपासून मुक्ता आणि सागरचा लग्नसोहळा पार पडणार आहे. या लग्नसोहळ्याला ‘ठरलं तर मग’ या मालिकेतील अर्जुन-सायली यांनी हजेरी लावली आहे. मुक्ता-सागरच्या लग्नसोहळ्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मुक्ता आणि सागर लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. खरंतर दोघांचे स्वभाव अतिशय वेगळे असले तरी या दोघांना सईच्या आनंदासाठी एकत्र येण गरजेचच आहे.आता सई हे जरी कारण असलं तरी पुढे जाऊन याचं नात फुलणार का हे पाहणं औस्तुकत्तेचं ठरणार आहे. सईवरच्या प्रेमापोटी या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लवकरच तो पूर्णत्वासही जाणार आहे. गोखले कुटुंबाच्या रितीरिवाजाप्रमाणे लग्न पार पडणार असणार असलं तरी या लग्नात कोळी ठसकाही असणार आहे. लग्न मंडपात वाजत-गाजत सागर आणि त्याच्या कुटुंबाचं आगमन होणार आहे. संपूर्ण कुटुंब कोळी पेहरावात दिसणार आहे. त्यामुळे लग्नात खऱ्या अर्थाने मुक्ता-सागर सोबतच दोन कुटुंबही नव्या नात्यात बांधली जाणार आहेत.

मुक्ता-सागरच्या लग्नासाठी ‘ठरलं तर मग’ मालिकेतले अर्जुन-सायली लावली खास हजेरी लावणार आहेत. यासोबतच लग्नात सावनीची देखील एन्ट्री होणार आहे. सावनीच्या येण्याने मालिकेत बरेच ट्विस्ट आणि ड्रामा पाहयला मिळणार आहेत. त्यामुळे लग्न निर्विध्नपणे पार पडणार का? याची मालिकाप्रेमींना आता उत्सुकता आहे.’प्रेमाची गोष्ट’ ही मालिकेत सई ही मुक्ता-सागरसाठी महत्तवाची असल्याने तिच्या मनाप्रमाणे होत असलेल्या गोष्टी यशस्वी होतील का ? हे देखील महत्तवाचं असणार आहे . चिमुकल्या सईवरच्या प्रेमापोटी दोन विभिन्न स्वभावाचे मुक्ता आणि सागर कसे एकत्र येतात आणि त्यांच्यातलं प्रेम आता कसं बहरणार कसे दोघ खऱ्या अर्थाने जवळ येणार ही कथा या मालिकेत दाखवण्यात येणार आहे.. या मालिकेत तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळे मुख्य भूमिकेत आहेत.प्रेक्षक दोघांच्या भूमिकेला चांगलीच पसंती दाखवत आहेत.

हे ही वाचा:

मुंबई पोलिसांनी वर्षभरात जप्त केले ४२० कोटीचे अमली पदार्थ, अनेक कारखाने जप्त

राज्यात कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा धुमाकूळ झाला सुरु, रुग्ण संख्या…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version