Thursday, February 29, 2024

Latest Posts

राज्यात कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा धुमाकूळ झाला सुरु, रुग्ण संख्या…

देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट धुमाकूळ घालतोय. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र गोवा या राज्यांमध्ये प्रादुर्भाव वाढत असल्याने या राज्यांमध्ये विशेष खबरदारी घेतली जात आहे.

देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट धुमाकूळ घालतोय. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र गोवा या राज्यांमध्ये प्रादुर्भाव वाढत असल्याने या राज्यांमध्ये विशेष खबरदारी घेतली जात आहे. संपूर्ण जगभरात दोन वर्ष धुमाकूळ माजवणाऱ्या कोरोनाची लस आली. त्यामुळे सर्वांनाच एक दिलासा हा मिळालं होता. आता कोरोना हद्दपार होईल, अशी अपेक्षा असताना नवीन व्हेरियंट भारतात दाखल झाला.

सर्वातआधी कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळून आला आहे. आणि JN1 Covid या नवीन व्हेरियंटने आता राज्यामध्ये देखील शिरकाव केला आहे. सर्वात आधी या नवीन व्हेरियंटचा रुग्ण हा कोकण मध्ये आढळून आला आणि आता त्या पाठोपाठ ठाणे आणि पुणे या शहरात देखील याचे रुग्ण मिळाले आहेत. ओमिक्रॉनच्या नव्या सब-व्हेरियंट JN.1 प्रकारामुळे चीन, सिंगापूर, भारतासह अनेक देशांमध्ये संसर्गाची प्रकरणे वाढत असल्यामुळे चिंता निर्माण झाली आहे. नवीन व्हेरियंट JN.1 चा संसर्ग झालेल्या व्यक्तीला चव आणि वास कळत नाही. ठाणे शहरात पाच तर पुणे शहरात तीन रुग्ण या व्हेरियंटचे मिळाले आहे. यामुळे राज्यातील नव्या व्हेरियंटची संख्या दहा झाली आहे.

 

ठाण्यात (Thane News) कोरोनाचा नवा व्हेरीयंट जेएन.1 चे पाच रुग्ण आढळले आहे. ठाण्यात आढळललेल्या पाच रुग्णात १ महिला आणि ४ पुरुषांचा समावेश आहे. ठाण्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २८ वर गेली आहे. आता या नव्या व्हेरियंटमुळे ठाणेकरांची चिंता वाढली आहे. तर पुणे शहरात २ तर पुणे ग्रामीणमध्ये १ रुग्ण आढळला आहे. यामुळे राज्यातील रुग्णसंख्या दहा झाली आहे. या सर्व रुग्णांना नवीन व्हेरियंटची सौम्य लक्षणे होती. त्यांना घरीच विलिगीकरणात ठेवण्यात आले. आता ते बरे देखील झाले आहेत.

तर सध्या सुट्टीचे दिवस असल्याने नागरीक पर्यटनसाठी बाहेर पडत असल्याने खबरदारीच्या सूचना करण्यात आल्या. ज्येष्ठ नागरिक, इतर व्याधींनी त्रस्त असणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे तसेच गर्दीत जाणे टाळावे, मास्कचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आलंय.

हे ही वाचा:

शंभूराज देसाई यांच्या गाडीवर बाटली उडाल्याने सगळीकडे एकच खळबळ

आरक्षणाचा खरा फायदा कुणाला? समाजाला की दोन्हीकडच्या नेत्यांना? |MANOJ JARANGE PATIL| CHHAGAN BHUJBAL

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss