Wednesday, February 28, 2024

Latest Posts

मुंबई पोलिसांनी वर्षभरात जप्त केले ४२० कोटीचे अमली पदार्थ, अनेक कारखाने जप्त

नवीन वर्ष सुरु होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत.

नवीन वर्ष सुरु होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अनेक ठिकाणी पार्टी केली जाते. त्यामध्ये अनेक ठिकाणी रेव्ह पार्ट्यांचाही समावेश असतो. या सर्व पार्ट्यांवर पोलीस नजर ठेवून आहेत. त्यात आता एका माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी २०२३ या वर्षात ४५० कोटी रुपये अमली पदार्थांवर जप्ती आणली आहे. विशेष बाब म्हणजे, यामध्ये ४०० कोटीपेक्षा जास्त एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. तसेच या वर्षात मुंबई पोलिसांनी वर्षभरात ४,८०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ नष्ट केले आहेत.

२०२३ या वर्षात मुंबई पोलिसांनी नाशिक आणि सोलापूरमध्ये अमलीपदार्थाचे कारखाने उद्ध्वस्त केले आहेत. मुंबई पोलिसांनी मागील दोन वर्षात साडेचार हजार कोटींहून जास्त किमतीचे एमडी जप्त केले आहेत. पोलिसांनी नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, नालासोपारा आणि गुजरात येथे अमली पदार्थ निर्मितीचे अनेक कारखाने उद्धवस्त केले आहेत. यावर्षी केलेल्या कारवाईमध्ये पोलिसांनी करोडो रुपयांचे ड्रग्स जप्त केले आहे. ४२० कोटी पेक्षा जास्त ड्रग्स जप्त केले आहे. पोलिसांनी २०२३ या सालात १३१९ जणांवर गुन्हा दाखल करून ४३७ कोटी ९८ लाखाचे अमली पदार्थ जप्त केले आहे. तसेच मुंबई पोलिसांनी साडेसात कोटी रुपयांचा गांजा जप्त केला आहे. ५० लाखांचे कोकेन, १० कोटींचे चरस, ४ कोटी २१ लाखांचे हेरॉईन जप्त केले आहेत.

हे ही वाचा:

राज्यात कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा धुमाकूळ झाला सुरु, रुग्ण संख्या…

ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का न लागू देता आरक्षण देणार | Devendra Fadnavis | Manoj Jarange Patil

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss