Monday, May 20, 2024

Latest Posts

निकारागुआच्या शेन्निस पलासियोस हिने पटकवला मिस युनिव्हर्स’चा किताब

मिस युनिव्हर्स या स्पर्धेत एकूण ८४ देशातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. तर उपांत्य फेरीत २० स्पर्धकांची निवड करण्यात आली होती.

मिस युनिव्हर्स या स्पर्धेत एकूण ८४ देशातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. तर उपांत्य फेरीत २० स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. दरम्यान आता मिस युनिव्हर्सच्या २०२३ च्या विजेतीच्या नावाची अखेर घोषणा करण्यात आली आहे. निकारागुआची शेनिस पॅलासिओस ही ७२ वी मिस युनिव्हर्स ठरली आहे.
जगातील अनेक सुंदर मॉडेल्सना मागे टाकत शेन्निस पलासियोस हिने ‘मिस युनिव्हर्स 2023’ च्या किताबावर स्वतःचं नाव कोरलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शेन्निस पलासियोस हिची चर्चा रंगली आहे. 72 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा एल साल्वाडोर येथील जोसे अडोल्फो पिनेडा एरिना येथे आयोजित करण्यात आली होती. यंदाच्या वर्षाची मिस युनिव्हर्स 2023 कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मिस युनिव्हर्स 2023 किताब शेन्निस पलासियोस हिने जिंकला आहे. ‘मिस युनिव्हर्स’चा किताब पटकावल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी शेन्निस पलासियोस हिला शुभेच्छा दिल्या आहे. ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकल्यामुळे शेन्निस पलासियोस आनंदी आहे. विजेती म्हणून स्वतःच्या नावाची घोषणा झाल्यानंतर शेन्निस पलासियोस भावुक देखील देखील झाली. मिस युनिव्हर्स २०२२ ची मानकरी आर बोनी गाब्रिअलने शेनिस पॅलासिओसला मिस युनव्हर्सचा मुकूट घातला.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिस युनिव्हर्सचा किताब पटकावणारी शेन्निस पॅलासिओस ही निकारागुआची पहिली महिला आहे. त्यामुळे ‘ब्युटी क्वीन’ हे किताब जिंकणे तिच्यासाठी देखील तेवढंच महत्त्वाचं होतं. सध्या संपूर्ण जगात फक्त आणि फक्त शेन्निस पलासियोस हिची चर्चा रंगली आहे. शेन्निस हिचं स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे. यावेळी मिस युनिव्हर्स निवडण्यासाठी स्पर्धकांना वेगवेगळ्या स्पर्धांचा सामना करावा लागला.हा किताब पटकवण म्हणजे खुप मेहनत,जिद्द आणि चिकाटी असणं खुप गरजेच आहे.

दरम्कोयान तिला  कोणत्या एका महिलेचे आयुष्य एक वर्ष जगायला आवडेल असा प्रश्न अंतिम सामन्यात विचारण्यात आला होता. यावेळी शेनिसच्या उत्तराने परिक्षकांचं मन जिंकलं, त्यामुळे तिला मिस युनिव्हर्सचा खिताब दिला आहे.महिला हक्क कार्यकर्त्या आणि स्त्रीवादाची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेरी वोलस्टोनक्राफ्टचं आयुष्य एक वर्ष जगायला आवडेल, असं शेनिस म्हणाली.

‘मिस युनिव्हर्स 2023’ च्या अंतिम सोहळ्यात GRAMMY विजेते जॉन लीजेंड यांनी देखील उपस्थितांना आपल्या संगीताने मंत्रमुग्ध केले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘मिस युनिव्हर्स 2023’ मध्ये तब्बल 84 स्पर्धकांनी भाग घेतला होता. तर उपांत्य फेरीत २० स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. या २० स्पर्धकांमध्ये भारताची मॉडेल श्वेता शारदा हिचाही समावेश होता. ‘मिस युनिव्हर्स 2023’ शो जवळपास 13000 लोक लाईव्ह पाहात असल्याची देखील चर्चा रंगत आहे. सोशल मीडियावर शोचे अनेक फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत.

Latest Posts

Don't Miss