Monday, May 20, 2024

Latest Posts

प्रत्येक पुरुषांनीही हा चित्रपट पाहायला हवा, राज ठाकरे, १०० रुपये तिकीट

'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. या चित्रपटाबद्दल चांगलाच बोलबाला आहे.

‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhaari Deva) हा मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. या चित्रपटाबद्दल चांगलाच बोलबाला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन महिना झाला असेल परंतु अजूनही हा चित्रपट सिनेमा बॉक्स ऑफिसवरील सत्ता गाजवत आहेच परंतु आता प्रतिष्ठीत व्यक्तिमत्वांनीही या सिनेमाचं भरभरुन कौतुक केलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील या चित्रपटाबद्दल भाष्य केला आहे. याबाबतीत बोलताना राज ठाकरे म्हणाले, हा सिनेमा पाहिला असून ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा फक्त महिलांनी नाही तर प्रत्येक पुरुषांनीही पाहायला हवा, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाले,”बाईपण भारी देवा’ हा सिनेमा स्त्रिया पाहत आहेतच पण पुरुषांनीही पहावा असा हा सिनेमा आहे. आपल्या माता, भगिनी कोणत्या कोणत्या परिस्थितीतून जातात ते समजण्याची ही गरज आहे. सिनेमा पाहिल्यावर महिला स्वतःला रिलेट तर करतातच, परंतू पुरुषांनीही आपल्या रोजच्या जीवनात जर काही चुकीच्या गोष्टी असतील तर त्या काढून टाकणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच बाईपणच्या कथानकाचं खरं यश हे आहे. या चित्रपटामध्ये कलाकारांचा उत्तम अभिनय, उत्कृष्ट कथानक, सुरेल गाणी अन् दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या अष्टपैलू दिग्दर्शनामुळे बॉक्सऑफिसवर मराठी सिनेमाने, इतर अनेक सिनेमांना मागे टाकत, आपला जोरदार ठसा उमटवला आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर सध्या ‘बाईपण भारी देवा’ या मराठी सिनेमाचा बोलबाला आहे.”

आजपासून ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचे तिकीट फक्त १०० रुपयांमध्ये मिळणार आहे. केदार शिंदेंनी एक खास पोस्ट शेअर करत यासंदर्भामध्ये माहिती दिली आहे. त्यांनी लिहिलं आहे, “हा सिनेमा “तीने” डोक्यावर घेतला. पण खरतर मी तो पुरूषांसाठी सादर केला होता. कारण जोवर तो तीचं मन समजून घेत नाही तोवर काहीच वेगळं घडणार नाही!! आता मात्र तीचा मान सन्मान राखा. या शुक्रवार पासून ही बंपर ॲाफर समस्त पुरूष वर्गाला!! चांगला सिनेमा तुमची थिएटर मध्ये वाट पाहतोय… फक्त १०० रुपयांत”. या चित्रपटाची मोठी स्टार कास्ट आहे. या चित्रपटामध्ये केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित या सिनेमात वंदना गुप्ते (Vandana Gupte), रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), शिल्पा नवलकर (Shilpa Navalakar), सुकन्या मोने (Sukanya Mone) आणि दीपा परब (Deepa Parab) मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट लवकरच १०० कोटींचा टप्पा लवकरच पार करणार आहे.

हे ही वाचा:

अमित शाह यांची लोकसभेत काँग्रेसवर घणाघात टीका

जुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी पुन्हा संपाच्या तयारीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss