Saturday, May 18, 2024

Latest Posts

Central railway : फर्स्ट क्लास तिकीट धारकांना आता, एसी लोकलमधील प्रवासाची तरतूद

रेल्वे प्रशासनाने मुंबईकरांसाठी मोठा आणि दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. मुंबईत गर्दी वाढली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात लोकलने लोक प्रवास करत असतात. लोकलने प्रवास करणाऱ्यांमध्ये मध्यमवर्गीय लोकांची मोठी संख्या आहे. यामधील ज्या लोकांना लोकलच्या फर्स्ट क्लासचे तिकीट परवडत नव्हते त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे एसी लोकल पाठोपाठ आता लोकलच्या फर्स्ट क्लासचे तिकीट किंवा फर्स्ट क्लासचे पास धारणा असलेल्या प्रवाश्यांना आता एसी लोकल मधून प्रवास करण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे फर्स्ट क्लासच्या डब्यासह एसी लोकलयामध्ये प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. परंतु मासिक पासच्या किंमती कमी करण्यात आल्या नाहीत यामुळे काही प्रवाशांची नाराजी आहे.

हेही वाचा : 

मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागणार, जाणून घ्या काय असतील नवे दर ?

सहामाही आणि वार्षिक सीझन तिकीटधारकांना एसी ईएमयूमध्ये प्रवास करण्याची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे, फर्स्ट क्लास तिमाही, सहामाही आणि वार्षिक सीझन तिकीटे आणि एसी तिमाही, सहामाही आणि वार्षिक सीझन तिकीट यांच्यातील भाड्यातील फरक गोळा केला जाईल. प्रथम श्रेणी QST, HST आणि YST मध्ये शिल्लक राहिलेल्या दिवसांची पर्वा न करता संपूर्ण कालावधीसाठी आणि त्याची वैधता केवळ प्रथम श्रेणी QST, HST आणि YST च्या वैधतेनुसार असेल.ही सुविधा २४.०९ .२०२२ (२३/२४.०९.२०२२ च्या मध्यरात्री) पासून उपलब्ध आहे.

एकनाथ खडसे पुन्हा एकदा पक्षांतर करणार का?, राजकीय वर्तुळात चर्चा

Latest Posts

Don't Miss