Saturday, May 18, 2024

Latest Posts

स्पायडर मॅनच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज, Spider-Man: Across the Spider-Verse ओटीटीवर झाला रिलीज…

'स्पायडर -मॅन अॅक्रॉस द स्पायडर -वर्स' (Spider-Man: Across the Spider-Verse) या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर (Box office) धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट १ जून २०२३ रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता.

‘स्पायडर -मॅन अॅक्रॉस द स्पायडर -वर्स’ (Spider-Man: Across the Spider-Verse) या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर (Box office) धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट १ जून २०२३ रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. आता हा चित्रपट ओटीटीवर (OTT) रिलीज झाला आहे. आज (८ ऑगस्ट) हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला आहे. कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्हाला हा चित्रपट पाहता येईल? त्याबद्दल जाणून घेऊयात…

‘स्पायडर -मॅन: अॅक्रॉस द स्पायडर -वर्स’ हा चित्रपट झी-५ (Zee-5) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहू शकता. १९० पेक्षा जास्त देशातील लोक हा चित्रपट पाहू शकणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन जोआकिम डॉस सँटोस (Directed by Joaquim dos Santos), जस्टिन के. थॉम्पसन (Justin K. Thompson), केम्प पॉवर्स (Kemp Powers) यांनी केलं आहे. ‘स्पायडर – मॅन अॅक्रॉस द स्पायडर -वर्स’ या चित्रपटातील अॅनिमेटेड कॅरेक्टर्सला (animated characters) शमिक मूर (Shameik Moore), हेली स्टेनफेल्ड (Hailee Steinfeld), ब्रायन टायरी हेन्री (Brian Tyree Henry), लुना लॉरेन वेलेझ (Luna Lauren Vélez), जेक जॉन्सन (Jake Johnson), जेसन श्वार्टझमन (Jason Schwartzman), इसा रे (Issa Rae), करण सोनी (Karan Soni), शी ग्रेटा (Shea Whigham), ग्रेटा ली (Greta Lee), व्हॉईस आहेत. डॅनियल कालुया (Daniel Kaluuya), माहेरशाला अली (Mahershala Ali) आणि ऑस्कर आयझॅक (Oscar Isaac) या कलाकारांनी आवाज दिला आहे.

जून महिन्यामध्ये ‘स्पायडर -मॅन: अॅक्रॉस द स्पायडर -वर्स’ (Spider-Man: Across the Spider-Verse) हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला होता. चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. कथाकथन आणि जबरदस्त अॅनिमेशन या गोष्टींमुळे या चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांवर छाप सोडली आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या ओटीटीवर पाहता येणार आहे. स्पायडर -मॅन (Spider-Man) या सुपरहिरोचे चित्रपट बघायला अनेकांना आवडतात. त्यामुळे आता ‘स्पायडर -मॅन: अॅक्रॉस द स्पायडर -वर्स’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. ‘स्पायडर -मॅन: अॅक्रॉस द स्पायडर -वर्स’ या चित्रपटामधील अॅनिमिटेड दुनिया तसेच चित्रपटाचे कथानक नक्कीच तुमचे मन जिंकले.

हे ही वाचा:

भारताची ही प्लेइंग ११ होणार का यशस्वी?

करण जोहरने सांगितले की, आलिया भट्टने केले दोन वेळा लग्न?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss