Saturday, May 18, 2024

Latest Posts

हॅरी पॉटर मधील ‘हे’ कलाकार दिसणार हिंदी वेब सिरीज मध्ये.

सध्या दिग्दर्शक हंसल मेहता हे महात्मा गांधींच्या आयुष्यावर आधारित ‘गांधी’ या वेब सिरीजवर काम करत आहे. नुकत्याच मिळालेल्या माहिती नुसार या वेब सिरीज मध्ये आंतराष्ट्रीय कलाकार देखील पाहायला मिळणार आहेत. यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेची लहर पाहायला मिळत आहे. हॅरी पॉटर या चित्रपटातील अनेक कलाकार आता या वेब सिरीज मध्ये दिसून येणार आहेत. या वेब सिरीज मध्ये प्रतीक गांधी हे प्रमुख भूमिका साकारताना दिसून येणार आहेत.

हॅरी पॉटर हा एक गाजलेला चित्रपट असून या चित्रपटात महत्वाची भूमिका पार पाडणारा कलाकार टॉम फेल्टन हा हंसल मेहता यांच्या ‘गांधी’ या वेब सिरीज मध्ये पाहायला मिळणार आहे. टॉम फेल्टन आणि प्रतीक गांधी एकाच फ्रेम मध्ये पाहायला मिळणार आहेत. हॅरी पॉटरमध्ये टॉमने ड्रॅको मालफॉय हि महत्वाची भूमिका पार पडली होती. टॉम फेल्टनचा हंसल मेहता दिग्दर्शित ‘गांधी’ हा पहिला भारतीय प्रोजेक्ट असणार आहे. टॉम फेल्टन बरोबरच या सिरीज मध्ये लिबी मे, मॉली राईट, जेम्स मरे, सायमन लेनन, जोनो डेव्हिस, राल्फ एडेनी हे कलाकार देखील दिसणार आहेत. प्रतीक गांधी हा मुख्य भूमिकेत दिसणार असून गांधींची भूमिका तो साकारणार आहे. या वेब सिरीज मध्ये प्रतिकसोबत त्याची पत्नीदेखील दिसणार आहे. प्रतीक गांधी यांची पत्नी भामिनी ओजा हि कस्तुरबा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे.

हॅरी पॉटर फेम टॉम फेल्टन हा जोशिया ओल्डफिल्डचे पात्र साकारणार आहे. जोशींच्या ओल्डफिल्ड हा महात्मा गांधींचा लंडनमधील शिक्षणादरम्यानचा पहिला चांगला मित्र होता. हंसल मेहता हे नावाजलेल्या दिग्दर्शकांपैकी एक आहेत. शाहिद आणि छलांग सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. महात्मा गांधींवरच्या या बायोपिक ची सगळ्यांना आतुरता लागून आहे.

हे ही वाचा:

Public Review । महिलांना आवडलेला ‘नाच गं घुमा’ पुरुषांच्या पसंतीस पडेल का? Public Review । महिलांना आवडलेला ‘नाच गं घुमा’ पुरुषांच्या पसंतीस पडेल का? Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss