Saturday, May 18, 2024

Latest Posts

एमएस धोनी आणि एमसी स्टेन करणार एकत्र काम,फोटो शेअर करत दिली हिंट

बिग बॉस सीजन 16' चा विजेता एमसी स्टॅनचा सोशल मीडियावर चाहता वर्ग फार मोठा आहे,सगळीकडे एमसी स्टेनला ओळखलं जात.

बिग बॉस सीजन 16′ चा विजेता एमसी स्टॅनचा सोशल मीडियावर चाहता वर्ग फार मोठा आहे,सगळीकडे एमसी स्टेनला ओळखलं जात.तो प्रसिद्ध रॅपर आहेत.लहानांपासून-मोठ्यांपर्यंत लाखोच्या संख्येने त्याचे चाहते आहेत.अनेकदा त्याच्या कॉन्सर्टमुळे तो चर्चेत राहतो. आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचं चर्चेत येण्याचं कारण त्याचा कॉन्सर्ट नाही, तर भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आहे. त्या दोघांचे काही फोटो समोर आले आहेत.

एमसी स्टॅननं त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.तर सोशल मीडियावर हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.या फोटोत त्या दोघांनी सूट परिधान केल्याचे दिसत आहे. हे फोटो शेअर करत एमसी स्टॅननं कॅप्शन दिलं की ‘एमएस धोनीसोबत काही खास शूट केलं आहे.’ आता त्या दोघांना एकत्र पाहिल्यानंतर सगळ्यांना एकच प्रश्न पडला आहे की नेमकं असं काय झालं.

या व्हायरल होत असलेल्या फोटोत महेंद्र सिंग धोनी हा एमसी स्टॅनचं फेमस असलेलं P Town साइन करताना दिसत आहे. दोघांना पाहून हे तर लक्षात आलं की त्यांच्या चाहत्यांसाठी हे खूप मोठं सरप्राइज असणार आहे. यात ते काही तरी हटके करतील. अनेकांना वाटतं की ही एक अॅड शूट असू शकते किंवा कोणत्या कार्यक्रमात गेस्ट अपीयरंस असू शकते. काही बोलू शकत नाही.

या व्हायरल होत असलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘धोनीच्या करिअरचा अंत होतोय.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘धोनी सर काय मजबूरी होती तुमची.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘माही का? असं का?’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘माही भाई तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती.’ आणखी एक नेटकरी म्हणाला की ‘धोनी भाई काय मजबूरी होती. आता असे दिवस पाहायला मिळतील.’ दुसरा नेटकरी म्हणाला, लेजंडसोबत छपरी.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘देवा, देवा काय मजबूरी होती. माझी इच्छाच मेली.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘ते दोघं एका फ्रेममध्ये दिसतील ही अपेक्षा केलीच नव्हती.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘मला लाज वाटते.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘पहिल्यांदा माहीवर राग येतोय. या छपरी लोकांसोबत नका राहत जाऊ माही.’ आणखी एक म्हणाला, ‘माही या मागचं कारण काय.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘मला वाटतं माही भाईची लोकप्रियता आता वाढणार.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘या कोलॅबरेशनविषयी मी कधी विचार केला नव्हता.’ अशा अनेक प्रतिक्रिया नेटकरी सोशल मीडियाच्या माध्यमातून देत आहेत.तर काही चाहते या दोघांना एकत्र पाहण्यासाठी उस्तुक देखील आहेत.

हे ही वाचा:

रामाचा सर्व हक्क भाजप घेऊ शकत नाही- माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे

Ram Mandir, श्री रामाला दाखवणार १५१ बनारसी पानांचा नैवेद्य…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss