Sachin Tendulkar Birthday:मास्टर ब्लास्टरचा आज जन्मदिवस, झाला ‘इतक्या’ वर्षाचा

क्रिकेटचा देव म्हणून सचिन तेंडुलकर यांस ओळखले जाते. क्रिकेटमधील अनेक विक्रम सचिनने आपल्या नावावर केले आहेत. क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा आणि अनेक शतके करणारा म्हणून तो ओळखला जातो. सचिनने अनेक पुरस्कार देखील मिळवले आहेत.

Sachin Tendulkar Birthday:मास्टर ब्लास्टरचा आज जन्मदिवस, झाला ‘इतक्या’ वर्षाचा

क्रिकेटचा देव म्हणून सचिन तेंडुलकर यांस ओळखले जाते. क्रिकेटमधील अनेक विक्रम सचिनने आपल्या नावावर केले आहेत. क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा आणि अनेक शतके करणारा म्हणून तो ओळखला जातो. सचिनने अनेक पुरस्कार देखील मिळवले आहेत. सचिनचा जन्म २४ एप्रिल १९७३ रोजी मुंबई मधेच झाला होता. लहानपणापासून सचिनला क्रिकेटची आवड होती. शालेय स्तरावर अनेक विक्रम करत नंतर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्येही आपले नाव कोरले. वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी सचिनने क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. सचिनने १५ नोव्हेंबर १९८९ रोजी पाकिस्तानविरोधात पहिला सामना खेळला होता पण त्यात त्याने फक्त १५ धाव केल्या होत्या.

सचिनची प्रेमकहाणी ही काहीशी रोमँटिक आहे. सचिनची आणि त्याची पत्नी अंजलीची १९९० मध्ये मुंबई विमानतळावर भेट झाली होती. त्यावेळी दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. अंजली सचिनपेक्षा ६ वर्षांनी मोठी आहे. सहारा कप जिंकल्यानंतर या कपावरून सचिनने आपल्या मुलीचे नाव सारा असे ठेवले होते. सचिनला महान फलंदाज मानले जाते. आजपर्यंतच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सचिनच्या नावावर २०१ विकेट्स आहेत. १९८७ च्या वर्ल्ड कपच्या वेळी सचिन अवघ्या १४ वर्षांचा होता आणि तेव्हा तो बॉल बॉय म्हणून काम करायचा. सचिनने आजवर अनेक पुरस्कार जिंकले आहेत त्यात भारतरत्न, पदमश्री, राजीव गांधी क्रीडा पुरस्कार, व पदमविभूषण यांचा समावेश आहे. हे सर्व पुरस्कार मिळवणारा सचिन एकमेव आहे. तसेच सचिन हा प्रचंड वडापावप्रेमी आहे. वडापाव म्हणजे त्याचा आवडता नाश्ता मानला जातो.

सचिनने त्याच्या क्रिकेटच्या कारकिर्दीत ६६४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण ३४,३५७ धाव केल्या आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये सर्वाधिक शतके आणि अर्धशतके त्यांने कमावली आहे. सचिनने एकूण १०० शतके आणि १६४ अर्धशतके आपल्या नावावर केली आहेत. एवढे विक्रम करणारा तो एकमेव खेळाडू आहे.

हे ही वाचा:

अयोध्येनंतर महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी बिग बींनी खरेदी केली प्रॉपर्टी

BJP ने चावी दिली तेवढेच बोलणाऱ्या Eknath Shinde यांनी Congress वर बोलू नये, Nana Patole यांचा घणाघात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version