Saturday, May 4, 2024

Latest Posts

अयोध्येनंतर महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी बिग बींनी खरेदी केली प्रॉपर्टी

बॉलीवूड चे सिनिअर अभिनेते म्हणजे अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांनी मागेच अयोध्येमध्ये प्रॉपर्टी खरेदी केली होती. अमिताभ बच्चन यांने एक चित्रपटांचा पूर्ण काळ गाजवला आहे. याचबरोबर ते कोट्याधीश देखील आहेत. सोशल मीडिया वरती त्यांची तगडी फॅन फोल्लोविंग देखील आहे.

बॉलीवूडचे सिनिअर अभिनेते म्हणजे अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांनी मागेच अयोध्येमध्ये प्रॉपर्टी खरेदी केली होती. अमिताभ बच्चन यांने एक चित्रपटांचा पूर्ण काळ गाजवला आहे. याचबरोबर ते कोट्याधीश देखील आहेत. सोशल मीडियावर त्यांचे तगडे चाहते देखील आहेत. सोशल मीडियावर अमिताभ बच्चन सक्रिय देखील असतात. फोटोज आणि व्हिडीओज शेअर करताना ते दिसून येतात. कोट्यवधी लोक बिग बींचे चाहते आहे. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चनजींचा ‘गुडबाय’ (Goodbye) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.

काही दिवसांपूर्वी कोट्यवधी रुपये किमतीची प्रॉपर्टी अमिताभ बच्चनजींने अयोध्येमध्ये (Ayodhya) खरेदी केली. त्यांनी खरेदी केलेल्या या प्रॉपर्टीमुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. आता नुकतीच त्यांनी आणखी एक प्रॉपर्टी विकत घेतली आहे आणि या प्रॉपर्टीची किंमत देखील कोटींमध्ये आहे. अमिताभ बच्चनजींने द ‘हाऊस ऑफ लोढा’ (House Of Lodha) यांच्याकडून तब्बल १० कोटींची १०,००० चौरस फूट असलेली प्रॉपर्टी अलिबाग (Alibaug) मध्ये विकत घेतली आहे. गेल्याच आठवड्यात हा व्यवहार झाल्याचे समजून येत आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिल मध्ये सुरु झालेल्या अलिबागच्या २० एकरच्या प्लॉट डेव्हलपमेंट मध्ये ही जमीन खरेदी केली आहे. अमिताभ यांनी याच बिल्डरकडून अयोध्येत प्रॉपर्टी खरेदी केली होती. ‘द शरयू’ (The Sharayu) या प्रकल्प अंतर्गत ती होती. एका मागे एक अश्या प्रॉपर्टी खरेदी करताना अमिताभ दिसून येत आहेत. बरेच कलाकार सुट्ट्यांमध्ये अलिबागला राहण्यास पसंत करतात. अनेक शहरांमध्ये अमिताभ यांची प्रॉपर्टी आहे. अमिताभ मोठ्या संपत्तीचे मालक आहेत. नुकतीच दीपिका आणि रणवीर यांनीही प्रॉपर्टी खरेदी केली आहे.

हे ही वाचा:

MNS नेत्या Shalini Thackeray यांचा Mahayuti ला घरचा आहेर, BJP च्या ‘या’ उमेदवारांना मनसेचा पाठिंबा नाही

Ananya panday बद्दल मोठा खुलासा, काय म्हणाले Chunky Panday?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss