Saturday, May 18, 2024

Latest Posts

‘Kon Honar crorepati’ मध्ये विशेष भागात दिसणार तीन यार

'कोण होणार करोडपती' याचे नवे पर्व काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. कोण होणार करोडपती’मध्ये शनिवारच्या ‘विशेष भागात' अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) आणि अभिनेते शिवाजी साटम (Shivaji Satam) हॉट सीटवर बसणार आहेत.

‘कोण होणार करोडपती’ याचे नवे पर्व काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. कोण होणार करोडपती’मध्ये शनिवारच्या ‘विशेष भागात’ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) आणि अभिनेते शिवाजी साटम (Shivaji Satam) हॉट सीटवर बसणार आहेत. दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम हे दोघे जुने मित्र आहेत. शनिवारच्या भागामध्ये महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम यांच्याशी गप्पा रंगणार आहेत. या जुन्या मित्रांसोबत शनिवारच्या भागामध्ये गप्पा रंगणार आहेत आणि अनेक किस्से पाहायला आणि ऐकायला मिळ्णार आहेत.

कॅन्सर पेशंट्स अँड असोसिएशन (CPAA) या संस्थेसाठी महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहेत. शनिवारच्या भागामध्ये ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर तीन जुने मित्र एकत्र भेटणार आहेत आणि हे पाहणे महत्वाचे आणि गमतीदार ठरणार आहे. पहिल्यांदा झालेली भेट ते आत्तापर्यंत एकत्र केलेली सगळी कामे यांबद्दलचे किस्से प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. महेश मांजरेकर, शिवाजी साटम आणि सचिन खेडेकर या तिघांची जुनी मैत्री आहे. हे अनोखे मैत्रीचे नटे आपल्याला विशेष भागामध्ये पाहायला मिळणार आहे.

‘कोण होणार करोडपती’ याचा एक शनिवारच्या भागाचा प्रोमो रिलीज झाला आहे आणि या भागामध्ये शिवाजी साटम यांनी आपले पहिले नाटक ‘संगीत वरदान’ या वेळचा किस्सा सांगितलं आहे. पहिल्यांदा ते प्रेक्षकांना कसे सामोरे गेले याची आठवण सांगितली. त्या वेळी महेश मांजरेकर यांनी ‘कूछ तो गडबड है’ असे म्हणत शिवाजी साटम यांची फिरकी घ्यायचा प्रयत्न केला. महेश मांजरेकर यांनी आपल्या पहिल्यावाहिल्या ऑडिशनची आठवण शेअर केली आहे. विशेष म्हणजे या दिग्गज कलाकारांना एकाच वेळी एकाच मंचावर पाहणे ही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

हे ही वाचा : 

बिपरजॉय चक्रीवादळाचा लांबपल्याच्या गाड्यांवर मोठा परिणाम, पश्चिमी रेल्वेकडून नवीन अपडेट जारी

साखर कारखान्यासाठी असलेली २५ किलोमीटरची अट समितीद्वारे होणार शिथील, मुख्यमंत्री

International Yoga Day 2023: जाणून घ्या योगाचे प्रकार फक्त एका क्लिकवर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss