Friday, May 17, 2024

Latest Posts

विजय देवरकोंडाने वापरली नवी शिक्कल, LIGER सिनेमाच्या ट्रेलर लाँच वेळेस सगळ्यांना आश्चर्याचा धक्का

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ट्रेलर लॉन्चच्या वेळी विजय देवरकोंडा यांनी घातलेल्या चप्पलची किंमत फक्त 199 रुपये होती.

मुंबई : चित्रपटातील कलाकारांच्या कपड्यांची किंमत हजारो ते लाखो रुपयांपर्यंत असते. जे एका सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर असते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ट्रेलर लॉन्चच्या वेळी विजय देवरकोंडा यांनी घातलेल्या चप्पलची किंमत फक्त 199 रुपयांचीआहे. तसेच दाक्षिणात्य कलाकार त्यांच्या साधेपणासाठी ओळखले जातात. मग तो प्रभास असो, रजनीकांत असो की विजयदेवरकोंडा. विजय देवरकोंडाचा बहुचर्चित चित्रपट लिगरचा ट्रेलर गुरुवारी मुंबईत लाँच करण्यात आला होता. चित्रपटाच्या ट्रेलरलॉन्चच्या वेळी, सर्वांचे लक्ष विजय देवरकोंडाच्या चप्पलकडे होते, त्याने केवळ 199 रुपयांच्या चप्पला घातल्या होत्या. चला तर मगजाणून घेऊया अभिनेत्याने असे का केले.

हेही वाचा:

म्हणूनच बायकांना ‘हुशार’ म्हणतात, नवऱ्याला मूर्ख बनवुन त्याला मारले. विश्वास बसत नसेल तर पहा व्हिडिओ

विजय देवरकोंडा खूपच कॅज्युअल लूकमध्ये होता. त्याच्या स्टाईलिश हरमन कौरने त्याने 199 रुपयांची चप्पल का घातली हे सांगितले. मुंबईत लिगरच्या ट्रेलरच्या प्रमोशनपूर्वी विजय हैदराबादमध्ये अनन्यापांडेसोबत होता. मुंबईतील एका कार्यक्रमात अभिनेता रणवीर सिंग देखील त्याच्या लूकवर कमेंट करत म्हणाला, ‘भाईची स्टाइल बघा, असं वाटतंय की तो माझ्या ट्रेलर लाँचला आलाय आणि मी त्याचा ट्रेलर लॉन्च करायला आलोय’.

अभिनेत्याची स्टायलिस्ट हरमन कौरने मीडिया पोर्टलशी बोलताना सांगितले. मी लिगरच्या प्रमोशनची वाट पाहत होते. विजयच्या लुकसाठी अनेक ब्रँड आणि डिझायनर प्रयत्न करत होते . विजयने मला फोन करेपर्यंत मी अभिनेत्यांचा लूक बनवण्याच्या तयारीत होते. विजय देवरकोंडा यांनी खास मला बेसिक चप्पल मागितली आणि सांगितले की ती कॅरेक्टरच्या अगदी जवळ वाटली पाहिजे. मला विजयचा ड्रेसिंग सेन्स आवडला. मला विजयच्या ड्रेसिंगसेन्स बद्दल आत्मविश्वास होता. मला माहित होते. की तो असे काहीतरी करेल जे देशभरात चर्चेचा विषय बनेल. आणि तसेच घडताना आपण पाहत आहोत.

Latest Posts

Don't Miss