Saturday, May 18, 2024

Latest Posts

अभिनेत्री रुपल नंद चा लग्न सोहळा पार पडला

‘श्रीमंता घरची सून’ मालिकेतली अभिनेत्री रुपल नंद चा नुकताच लग्न सोहळा पार पार पडला.

मुंबई: ‘श्रीमंता घरची सून’ मालिकेतून रूपल नंद आणि यशोमान आपटे हे कलाकार आपल्या भेटीला आले होते. मालिकेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेतली अभिनेत्री रुपल नंद चा नुकताच लग्न सोहळा पार पार पडला. अनिश कानविंदे याच्या सोबत रुपल ने लग्न गाठ बांधली. या लग्नाला जवळच्या कुटुंबीयांनी उपस्थिती लावली होती.
अभिनेत्री रुपल नंद च्या लग्नाला अनेक कलाकार ही उपस्थित होते. यावेळी श्रीमंता घरची सून मालिकेतली तिच्या सहकलाकारांनी उपस्थिती लावली. अभिनेता यशोमान आपटे, गुरुदत्त दिवेकर, मधुरा जोशी दिवेकर, ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर या कलाकार मंडळींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. रुपलचा लग्नातील गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केलेला फोटो समोर आला आहे. या लेहेंग्यात रुपल खूप सुंदर दिसतेय. चाहत्यांनी रूपल आणि अनिशला लग्नाच्या खूप शुभेच्छा दिल्या आहेत.
‘गोठ’ मालिकेतून मराठी टिव्ही विश्वात पदार्पण करणाऱ्या रूपल नंद ने साकारलेली ‘राधा’ हि मुख्य व्यक्तिरेखा सर्वांनाच आवडली. पुढे तिने ‘फुलपाखरू’ मालिकेत रेवती हि व्यक्तिरेखा साकारली. त्यानंतर तिने आनंदी हे जग सारे मालिकेत आनंदी ची भूमिका ही साकारली. सध्या रूपल च्या आगामी प्रोजेक्ट्स बद्दल माहिती मिळालेली नाही.

Latest Posts

Don't Miss