भरउन्हात उसाचा रस पिताय ? एकच ग्लास प्या नाहीतर……

भरउन्हात उसाचा रस पिताय ? एकच ग्लास प्या नाहीतर……

सध्या सर्वत्रच उष्णतेची लाट पसरली आहे. यामुळे शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या असा  सल्ला सर्वजण देत असतात. पण सारखंसारख  पाणी पियायला कंटाळा येतो. त्यामुळे उसाचा रस हा योग्य पर्याय आहे. उसाचे रस पिल्याने शरीराला खूप फायदे होतात. चला तर मग जाणून घेऊयात उसाच्या रसाचे फायदे. शरीर जर हायड्रेट ठेवायचं असेल तर तुम्ही दररोज उसाच्या रसाचे सेवन करू शकता. यामुळे धकवा दूर होतो आणि पूर्ण दिवस ताजे राहू शकता.

आयुर्वेदामध्ये उसाचा रस हा औषधी मानला जातो. उसाच्या रसामध्ये विविध प्रकारचे अँटीऑक्सीड असतात. ज्यामुळे लिव्हरवरचा कोणताही आजार होत नाही. उसाचा रस हा टॉनिक म्हणून पचनाच्या समस्यांवर काम करतो. उसामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात. अशक्तपणा  असलेल्या लोकांनी उसाचे रस पिल्यास शरीरावर चांगले फायदे होतात. उसाचा रस पिल्याने हाडे मजबूत होतात. कॅल्सिअमसारखे पोषक घटक शरीरामध्ये जाऊन  शरीरात ताकद निर्माण करतात. बाजारातले हानिकारक पदार्थ शरीरावर दुष्परिणाम करतात. पण उसाच्या एक ग्लास रसाने कोणतीच हानी होत नाही. तीन चार ग्लास उसाचा रस पिल्यास उलट्या होऊ शकतात. मधुमेह असलेल्या व्यक्तीने उसाच्या रसाचे सेवन करणे टाळा. कफाचा त्रास असल्यावर उसाचा रस पिऊ नये.  उसाच्या रसामध्ये कोत्याही प्रकारचे रस एकत्र करून पिऊ नये.

हे ही वाचा:

”तुला पाहते रे” ची नायिका दिसणार नव्या भुमिकेत

”या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केला राजकारणात प्रवेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version