Friday, May 17, 2024

Latest Posts

”तुला पाहते रे” ची नायिका दिसणार नव्या भुमिकेत

”तुला पाहते रे”  या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री गायत्री दातार (Gayatri Datar) हिची नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचे नाव ”अभिर गुलाल” असून ही मालिका कलर्स मराठीवर दिसणार आहे. या मालिकेत गायत्रीने  खलनायिकेची  भूमिका  साकारणार आहे. गायत्री ही  शुभ्रा नावाचे पात्र  साकारणार आहे. या पात्राला  काळ्या रंगाची चीड असते. पहिल्यांदाच गायत्री खलनायिकेची भूमिका साकारणार असून तिचे चाहते तिला पाहण्यासाठी   खूप उत्सुक आहेत. तिच्या विरुद्ध एका सावळ्या मुलीची कहाणी या मालिकेत दाखवण्यात येणार आहे.  त्या मुलीला तिच्या सावळ्या  रंगाचा गर्व असतो. 

अभिनेत्री पायल जाधव (Payal Jadhav) ही श्री नावाचे पात्र  साकारणार आहे. नागराज मंजुळे(Nagraj Manjule) यांच्या ”बापलेक” या चित्रपटात पायलने काम केले होते. त्यामुळे ही पायलची पहिलीच मालिका असणार आहे. या नव्या कथेसाठी आणि नवीन चेहऱ्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ‘गुंतलेल्या नशिबांचा गुंतलेला खेळ-अभिर गुलाल’  या मालिकेचा १ मे रोजी ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

हे ही वाचा:

वाढत्या उन्हाचा चेहऱ्यावर परिणाम होतोय? मग हा उपाय केलात का?

महादेव बॅटिंग अँप प्रकरणात ”या” अभिनेत्याला अटक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

 

Latest Posts

Don't Miss