सर्वत्र राजकारणाचे वारे वाहत आहेत. त्याचबरोबर अनेक कलाकार पण राजकारणात एन्ट्री करत आहेत. सध्या एक नवीन अभिनेत्री पण राजकारणात एन्ट्री करणार आहे. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोण नसुन ती म्हणजे रुपाली गांगुली आहे.अभिनेत्री रुपाली गांगुली ही एक भारतीय अभिनेत्री आहे. रुपालीच्या ”अनुपमा” या मालिकेची चर्चा सगळीकडे सुरू असते. पण रुपाली सध्य एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.रुपाली गांगुलीने ”भारतीय जनता पार्टी” या पक्षात प्रवेश केला आहे.सध्या रुपाली स्टार प्लस वर सुरु असलेली मालिका अनुपमामध्ये काम करत आहे. रुपाली गांगुली ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.लहानपणापासूनच अनुपमाने चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. वयाच्या ७ व्या वर्षी वडिलांसोबत ”साहेब” या चित्रपटात तिने काम केले होते. त्यानंतर तिने चित्रपटांबरोबर मालिकेमध्ये पण काम करायला सुरुवात केली.रुपालीने उद्योगपती अश्विन वर्मासोबत ६ फेब्रुवारी २०१३ मध्ये लग्नगाठ बांधली आणि त्या दोघांना एक मुलगा पण आहे.