मासिकपाळी का उशिरा येते; जाणून घ्या करणे

बाईसाठी मासिकपाळी येणे हे खूप महत्वाचे आहे.

मासिकपाळी का उशिरा येते; जाणून घ्या करणे

बाईसाठी मासिकपाळी येणे हे खूप महत्वाचे आहे. बदलत्या जीवनशैली आणि ताणतणावामुळे महिलांना स्वतःकडे लक्ष्य देता येत नाही . या सर्व कारणांमुळे बहुतेक वेळेस मासिकपाळी उशिरा येते . काहीवेळेस १ ते २ महिने अधिक उशिरा मासिकपाळी येते. उशिरा पाळी आल्यामुळे अमेनोरियाची समस्या असतात. अश्या वेगवेगळ्या समस्यांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ यांना भेट देणं गरजेचं आहे. मासिकपाळी सुरु होण्यापासून ते पुढच्या मासिकपाळी पर्यंत एक चक्र मानलं जात . या चक्राचा कालावधी हा २८ दिवसांचा असतो. एक सामान्य चक्र हे ३८ दिवसांचे असते. यापेक्षा जर जास्त कालावधी लागत असेल तर काही समस्या असु शकतात. वजन वाढणं,कमी होणं, हार्मोनल अनियमितता या देखील यामागचे एक कारण असू शकते.

थायरॉइड (Thyroid) हे मासिकपाळीला नियंत्रित करतात .खूप कमी किंवा खूप जास्त थायरॉइड संप्रेरक सायकल अनियमित बनवू शकतात . काही वेळा थायरॉइड मुळे मासिकपाळी अधिक काळ थांबू शकते . मेंदूच्या पिट्युटरी ग्रंथीतून प्रोलॅक्टिन हार्मोनचा स्राव होतो. प्रोलॅक्टिन संप्रेरके दग्धपणासाठी स्तनाच्या ऊतींचा दूध उतपादनासाठी महत्वाच्या असतात . रक्तामध्येय प्रोलॅक्टिनच्या सामान्य पातळीपेक्षा जास्त असल्यामुळे मासिकपाळी उशिरा येऊ शकते . उच्च प्रोलॅक्टिन पातळी अनियमित असल्यामुळे मासिकपाळीला उशीर होऊ शकतो .

जास्त वजन वाढल्यामुळे मासिकपाळीवर परिणाम होतो. इस्ट्रोजेनमुळे मासिकपाळी वर परिणाम होतो . UTI मूळे शरीरावर होणार परिणाम मासिकपाळी वर होण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेकदा मासिक पाळी येण्यासाठी विलंब होतो. जर तुमची जीवशैली तणावपूर्णक असेल तर तुम्हाला मासिक पाळी येण्यासाठी विलंब होऊ शकतो. तुम्हाला जर २ महिन्यांपेक्षा जास्त काळ मासिक पाळी येत नसेल अश्यावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे फार महत्वाचे आहे.

हे ही वाचा:

रणबीर कपूरच्या रामायण सिनेमात ‘या’ कलाकाराची होणार एन्ट्री

मनोज जरांगेंच्या परळीतील बैठकीला औरंगाबाद खंडपीठाकडून परवानगी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version