Monday, May 13, 2024

Latest Posts

मनोज जरांगेंच्या परळीतील बैठकीला औरंगाबाद खंडपीठाकडून परवानगी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे महाराष्ट्र दौरा करत आहेत.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे महाराष्ट्र दौरा करत आहेत. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे, या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. त्यातच आता मनोज जरांगे यांना औरंगाबाद खंडपीठाने मोठा दिलासा दिला आहे. मनोज जरांगे यांच्या बैठकीचे आज बीडमध्ये आयोजन करण्यात आले होते. मात्र या बैठकीसाठी बीड पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीमुळेराज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. परवानगी मिळत नसल्याने आयोजकांनी थेट औरंगाबाद खंडपीठात जाऊन धाव घेतली. मात्र न्यायालयाने अटी शर्तींच्या अधीन राहून बैठकीला परवानगी दिली आहे.

बीडमध्ये आज संध्याकाळी ६ वाजता मराठा समाजाने परळीत बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला मनोज जरांगे उपस्थित राहणार आहेत. मात्र राज्यात निवडणुका असल्याने आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जातीय सभा संमेलनावर, बैठकांवर बंदी घालण्यात आली आहे. याच आदेशामुळे पोलिसांनी परवानगी नाकारली. बैठकीच्या आयोजकांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेत याचिका दाखल केली. याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने अटी शर्तींच्या अधीन राहून बैठकीला परवानगी दिली आहे. त्यामुळे आयोजकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीवर पोलीस नजर ठेवून असणार आहेत. त्यामुळे आयोजकांना अटीशर्तींचे पालन करूनच बैठक घ्यावी लागणार आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे अनेक प्रयत्न करत आहेत. आज परळीमध्ये मनोज जरांगे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याच बैठकीत मनोज जरांगे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. याआधी झालेल्या प्रत्येक सभेत मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे आजच्या सभेत मनोज जरांगे नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Latest Posts

Don't Miss