Sunday, April 28, 2024

Latest Posts

रणबीर कपूरच्या रामायण सिनेमात ‘या’ कलाकाराची होणार एन्ट्री

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर(Actor Ranbir Kapoor) अभिनित रामायण हा चित्रपट लवकरच प्रेक्षांचा भेटीला येणार आहे.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर(Actor Ranbir Kapoor) अभिनित रामायण हा चित्रपट लवकरच प्रेक्षांचा भेटीला येणार आहे. या सिनेमाचे दिगदर्शन लोकप्रिय दिगदर्शक नितेश तिवारी यांनी केले आहे. रामायण या सिनेमाची घोषणा झाल्यानंतर चाहते खूप उत्सुक आहेत .रामायण चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. हा आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात रणबीर कपूर हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे .रणबीर कपूरच्या सिनेमाची चर्चा सध्या सगळीकडे सुरु झाली आहे .या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर प्रेक्षक चित्रपट पाहण्याच्या प्रतीक्षेत आहेत .

ह्या चित्रपटासंदर्भातील अनेक अपडेट्स समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वी सई पल्लवी हा चित्रपट करणार नसल्यचा समोर आला होते.पण आता ती या चित्रपटाचा भाग असणार आहे. सई पल्लवी,बॉबी देओल,सनी देओल,विजय सेतुपात हे सर्व कलाकार या चित्रपटात काम करणार आहेत. तसेच या सिनेमासाठी सीता आणि हनुमानच्या भूमिकेनंतर लक्ष्मणच्या भुमिकेसाठी कोण असणार असा प्रश्न सगळ्यांच पडला असेल ना.सिनेमात एका नवीन कलाकाराची एन्ट्री झाली आहे .लक्ष्मणच्या भुमिकेसाठी बॉलीवूड नवे तर टीव्हीस्टार कास्टला घेण्यात आले आहे.जमाई राजा फेम ‘रवी दुबे’ हा लक्ष्मणची भुमिका साकारणार आहे.रामायण या सिनेमामध्ये आणि बाकीच्या भूमिकेत कोण असणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. रामायण या चित्रपटात सीतारामच्या भूमिकेसाठी सगळ्याताआधी सई पल्लवी आणि बॉलीवूड अभिनेत्री आलीय भट ची निवड करण्यात आली होती. पण काही कारणामुळे तिने हा सिनेमा नाकारला होता. रामायण हा आगामी चित्रपट खूपच भव्यदिव्य असणार आहे. तगडी स्टारकास्ट असणाऱ्या या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली .येत्या १७ एप्रिल २०२४ ला रामनवमी निमित्त या चित्रपटाची घोषणा करण्यात येणार आहे .

हे ही वाचा:

मनोज जरांगेंच्या परळीतील बैठकीला औरंगाबाद खंडपीठाकडून परवानगी

निवडणुका जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता का लागू होते? Elections । Lok Sabha

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss