Saturday, May 18, 2024

Latest Posts

मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग का उडवला जातो? जाणून घ्या सविस्तर माहिती

नवीन वर्षाच्या सुरुवातीला मकर संक्रांत हा सण येतो.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला मकर संक्रांत (Makar Sankranti) हा पहिला सण येतो. संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने संक्रांत साजरी केली जाते. भारतीय सणांमध्ये सर्वच सणांना विशेष महत्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो, त्यामुळे संक्रांत ही महत्वाची मानली जाते. तसेच सूर्याचे उत्तरायणही याचं दिवशी होते. संक्रांतीच्या दिवशी तीळगुळाला फार महत्व आहे. संपूर्ण देशभरात यादिवशी पंतग (kite) उडवली जाते. काही ठिकाणी पतंगोत्सवाचे आयोजन केले जाते. आकाशात वेगवेगळ्या रंगाच्या पतंगामुळे आकाश रंगीबिरंगी दिसते. मात्र तुम्हाला माहित आहे का संक्रांतीच्या दिवशी पंतग का उडवली जाते? यामागे धार्मिक आणि शास्त्रीय अशी दोन कारणे आहेत.

मकर संक्रांतीला पतंग उडवण्यामागचे शास्त्रीय कारण

मकर संक्रांतीच्या दिवशी पंतग उडवणे हे आरोग्यासाठी फायदेशीर असते. आरोग्याच्या दृष्टीने या दिवशी पतंग उडवणे चांगले मानले जाते. थंडीच्या दिवसात अनेकांना घरामध्ये ब्लँकेटमध्ये राहणे आवडते, पण उत्तरायणाच्या दिवशी काही वेळ सूर्यप्रकाशात राहिल्यास शरीरातील अनेक आजार दूर होण्यास मदत होते उत्तरायणातील सूर्याच्या उष्णतेमध्ये सर्दी आणि थंडीमुळे होणारे आजार संपवण्याची क्षमता जास्त प्रमाणात असते. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा लोक घराच्या छतावर पतंग उडवतात तेव्हा सूर्याची किरणे औषधाप्रमाणे आपल्या शरीरावर काम करतात. त्यामुळेच मकर संक्रांतीच्या दिवसाला पतंगबाजीचा दिवस असेही बोलले जाते.

मकर संक्रांतीला पतंग उडवण्यामागचे धार्मिक कारण

दक्षिण भारतातील पौराणिक ग्रंथानुसार, भगवान श्रीरामांनी पतंग उडवण्याची परंपरा सुरू केली होती. भगवान श्रीरामांनी उडवलेला पतंग इंद्रलोकात गेल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तेव्हापासून आजही ही परंपरा देशभरात सगळीकडे पाळली जाते.

हे ही वाचा:

आदरणीय फडणवीस साहेब, कृपया सत्तेचा अहंकार सोडा – ROHIT PAWAR

मालदीवच्या पर्यटनाला मोठा फटका, भारतीय पर्यटकांकडून लक्षद्वीपला पसंती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss