Sunday, May 19, 2024

Latest Posts

Loksabha election 3rd Phase: महाराष्ट्रात सकाळी 9 पर्यंत 6.64 टक्के मतदान पूर्ण

तिसऱ्या टप्प्यात हायव्हॉल्टेज मतदान होणार आहे. त्यामुळे प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज मतदान होणार आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेच्या 93 जागांवर मतदान होत आहे. सकाळपासूनच अनेक दिग्गजांनी मतदान केंद्रावर हजेरी लावली आहे. बारामती, सातारा, सांगली, कोल्हापूर हातकणंगले, रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड, लातूर, सोलापूर, माढा अशा एकूण ११ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत मतदान पूर्ण झाले असून महाराष्ट्रात ६.६४ टक्के मतदान झाले आहे.आज सायंकाळी 7 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.  राज्यात 11 तर देशात 93 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.

कोणत्या मतदारसंघात ९ वाजेपर्यंत किती टक्के मतदान ? 

बारामती – ५.७७ %

सातारा – ७ %

सांगली – ५.१८ %

सोलापूर – ५.९२ %

कोल्हापूर – ८.०४ %

हातकणंगले- ७.५५  %

लातूर – ७.९१ %

रायगड – ६.४८ %

रत्नागिरी- सिंधुदुर्ग – ८.१७ %

धाराशिव – ५.७९  %

 २०१९ च्या टक्केवारी नुसार यंदा ची टक्केवारी कमी झाली आहे. कोल्हापुरात ८.०४ टक्के मतदान झाले आहेत तर बारामती लोकसभा मतदारसंघात ५.७७ टक्के, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ७.५५ टक्के, माढ्यात ४.९९ टक्के, धाराशिव मध्ये ५.७९ टक्के मतदान आणि रत्नागिरी- सिंधुदुर्ग  लोकसभा मतदारसंघात ८.१७ टक्के पूर्ण झाले आहे.रायगड मध्ये ६.४८ टक्के मतदान झाले आहे तर पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर मध्ये ५.९२ टक्के, साताऱ्यात ७ टक्के, सांगलीमध्ये  ५.१८ टक्के,  लातूर  ७.९१ टक्के इतकं मतदान झाले आहे. तिसऱ्या टप्प्यात हायव्हॉल्टेज मतदान होणार आहे. त्यामुळे प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

दरम्यान, बारामतीत सुप्रिया सुळे यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. लातूर येथे मंत्री संजय बनसोडे आणि रितेश देशमुख यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी मतदान केले आहे. कोल्हापूरात महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी देखील मतदान केले आहे तर साताऱ्यात महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे आणि महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

Latest Posts

Don't Miss