Tuesday, May 21, 2024

Latest Posts

अभिनेत्री वनिता खरातने शेअर केले खास फोटो

मराठी अभिनेत्री वनिता खरात ही छोट्या पद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक नाटक, रिऍलिटी शो, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.

मराठी अभिनेत्री वनिता खरात ही छोट्या पद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक नाटक, रिऍलिटी शो, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. वनिताचा जन्म १९ जुलै १९९२ मध्ये मुंबईमध्ये झाला आहे. तिने तिचे शालेय शिक्षण महात्मा ज्योतिबा फुले (girls high school) येथून पूर्ण केले.आणि पुढील महाविद्यालयीन शिक्षण कीर्ती कॉलेज मुंबई येथून पूर्ण केले. त्यानंतर २०२३ मध्ये वनिता आणि सुमित लोंढे लग्नगाठ बांधली. सध्या वनिता खरात ही सोनी मराठी वरील लोकप्रिय शो महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात आहे. या शो मुळे ती महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली.हास्यजत्रेमुळे तिने प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली.


नुकताच वनिता खरातने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. गणपती सणानिमित्त तिने खास पैठणी नेसली आहे. तिचा पैठणीचा लुक सर्वांचा आवडला आहे.
वनिताने शेअर केलेल्या फोटोला कॅप्शन दिले आहे, ‘गणेशोत्सवानिमित्त मी ही पैठणी साडी नेसली होती. ही साडी मला आमचे लाडके अरुण काका यांनी लग्नाची भेट म्हणून दिली होती.
महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून ती घराघरात पोचली आहे. तिच्या अभिनयामुळे तिने चाहत्यांची माने जिंकली आहेत.
वनिता ही तिच्या सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. साडीवरचे नवनवीन फोटो ती नेहमीच शेअर करत असते. तिच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
वनिता खरात ही तिच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकत असते. वनिता खरातच्या सर्वच सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते.

Latest Posts

Don't Miss