शिवनेरीवर अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील एकमेकांसमोर, समोर येताच अमोल कोल्हे आढळरावांच्या पाया पडले

लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत.

शिवनेरीवर अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील एकमेकांसमोर, समोर येताच अमोल कोल्हे आढळरावांच्या पाया पडले

लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि वंचित बहुजन आघाडीकडू उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सध्या राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. सगळीकडे शिरुर लोकसभेच्या उमेदवारांची मोठी चर्चा रंगली आहे. पुण्यातील शिरूरमध्ये अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील अशी लढत आगामी निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.अजित पवारांसाठी ही लढत महत्वाची असणार आहे.त्यातच अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळरावांची शिवनेरी गडावर भेट झाली. त्यावेळी अमोल कोल्हे यांनी हस्तांदोलन केलं आणि ते आढळरावांच्या पाया देखील पडले. दोघांनी शिरूर लोकसभेसाठी एकमेकांना शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळत आहे.

आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्याने दोन्ही नेते शिवनेरी गडावर शिवरायांच्या चरणी लीन होण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील यांची भेट झाली. त्यावेळी दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते आणि गडावरील लोक उपस्थित होते. अमोल कोल्हे यांच्या समोर आढळराव पाटील आल्यानंतर अमोल कोल्हेंनी त्यांना थेट वाकून नमस्कार केला. त्यानंतर दोघांमध्ये हसत गप्पा झाल्या आणि हस्तांदोलन करुन दोघेही आपापल्या मार्गाने मार्गस्त झाले. यातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन झाले आहे. त्यानंतर अमोल कोल्हे म्हणाले, दिल्लीच्या तख्तासमोर न झुकण्याची प्रेरणा किल्ले शिवनेरीवर मिळते.वयस्कर व्यक्तीला वाकून नमस्कार करणे ही संस्कृती आहे म्हणून की आढळराव पाटील यांना नमस्कार केला, ही संस्कृती जपली पाहिजे आणि लढण्यासाठी ताकद द्या, सर्वसामान्य नागरिकांसाठी लढण्याची प्रेरणा द्या, हेच आज शिवनेरीवर नतमस्तक होऊन मागणं मागितलं, असे अमोल कोल्हे म्हणाले.

राजकीय वर्तुळात शिरुर लोकसभा मतदार संघ चर्चेत आहे. त्यात आढळराव पाटील यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना आता राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होऊ शकतो. त्यांच्याविरोधात आता लोकसभा निवडणुकीमध्ये अमोल कोल्हे उभे राहणार आहेत. शिरूरमध्ये अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील असा सामना रंगणार आहे. अमोल कोल्हेंना पाडणार म्हणजे पाडणार,असा निर्धार अजित पवार यांनी केला आहे.

हे ही वाचा:

नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बच्चू कडूंनी केले मोठे विधान, आम्ही राणा यांचा..

लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version