Friday, May 17, 2024

Latest Posts

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नाशिकच्या काळाराम मंदिरात द्राक्षांची आकर्षक सजावट

अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी अवघे काही तास उरले आहेत.

अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. या सोहळ्यासाठी अयोध्येत जय्य्त तयारी करण्यात आली आहे. अयोध्येत रामाची जुनी मूर्ती मंदिरात दाखल करण्यात आली आहे. तसेच भव्य रामंदिराच्या गाभाऱ्याचे दार खुले करण्यात आले आहे. संपूर्ण परिसरात आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. १२ वाजून २९ मिनिटांनी अयोध्येत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या निमित्तांचे नाशिकचे काळाराम मंदिर देखील सजवण्यात आले आहे.

आज संपूर्ण देशभरात राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचा जोरदार उत्साह आहे. ५०० वर्षांच्या तपश्चर्येनंतर अखेर आज अयोध्येत रामाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. भव्यदिव्य महालात प्रभू राम विराजमान होणार आहेत. ऐतिहासिक विधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह संत समाज आणि विशेष लोक या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण देशवासीय या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचा संपूर्ण देशभर उत्साह आहे. याच पार्शवभूमीवर नाशिकच्या सुप्रसिद्ध काळाराम मंदिरात (Kalaram Mandir) आकर्षक द्राक्षांची सजावट करण्यात आली आहे. काळाराम मंदिरात तयार करण्यात आलेल्या आकर्षक द्राक्षच्या सजावटीमुळे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. तसेच नाशिकमध्ये मनसेच्या वतीने काळाराम मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. ५१ हजार मोतीचूरच्या लाडूचा नैवेद्य दाखवण्यात येणार आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे आमंत्रण ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांना सुद्धा देण्यात आले आहे. ठाकरे गटाकडून आज काळाराम मंदिरात श्रीरामाची पूजा आणि महाआरती केली जाणार आहे. तसेच उद्या ठाकरे गटाचे अधिवेशन असणार आहे. आज दुपारी उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला भेट देणार आहेत. त्यानंतर ते सकाळी काळाराम मंदिर आणि गोदा आरतीला जाणार आहे.

हे ही वाचा:

‘मंदिर वही बनायेंगे’ असा नारा देणारे लालकृष्ण अडवाणी यांचा अयोध्या दौरा रद्द

Ram Mandir : अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss