Saturday, May 18, 2024

Latest Posts

सरन्यायाधीशांचे मोठे विधान कपिल सिब्बल म्हणाले, कोणत्याही लोकशाहीला ते….

राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आज तिसरा दिवस आहे. दोन्ही पक्षांकडून पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे जोरदार युक्तीवाद सुरू आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत असताना सरन्यायाधीशांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. शिंदे गटाकडून बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे पुढची खेळी ओळखली गेली. पुढे काय होणार हे शिंदे गटाला माहित होतं, असं विधान सरन्यायाधीशांनी केलं आहे. ठाकरे गटाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांचा युक्तिवाद सुरू असतानाच सरन्यायाधीशांनी वरील विधान केलं आहे.

आज न्यायालयामध्ये सर्वप्रथम महेश जेठ मलानी (Mahesh Jethmalani) यांनी युक्तिवादाला सुरुवात केली. यावेळेस जेठमलानी यांनी आमदारांच्या जीवाला धोका असल्याच त्यांनी सांगितलं होत. त्यानंतर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यावेळेस कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारा बद्दल कोर्टात सांगितलं. तसेच विधानसभेचे नियम लोकसभेपेक्षा वेगळे असतात हे देखील सांगितलं. त्यावर टिपण्णी करताना सरन्यायाधिशानी दहाव्या सूचीच्या वापराचा उल्लेख केला. त्यावर सिब्बल यांनी सांगितलं की, “घटनेच्या १० व्या सूचीचा आधार घेऊन सरकार पाडण्यासाठी मार्ग तयार करुन देऊ नका. हे प्रकरण फक्त सध्यापुरतं मर्यादित नाही. या पुढील काळातही अशी प्रकरणं उद्भवू शकतात आणि १० व्या सूचीच्या आधारे देशातील सरकारं पाडू देऊ नका. हा प्रश्न वेळोवेळी उपस्थित होईल. निवडून आलेली सरकारे पाडली जातील. कोणत्याही लोकशाहीला ते परवडणारे नाही. त्यामुळे कृपया हे प्रकरण फक्त चर्चेचा विषय आहे असं म्हणू नका. मी तुमच्या पाया पडतो. दहाव्या सूचीच्या आधारावर सरकार पाडू देऊ नका”

यानंतर नबाम रेबीया प्रकरणावर पुन्हा चर्चा करण्यात आली. त्यावेळेस शिंदे गटाच्या याचिकेत तथ्यं लपवण्यात आल्याचा आरोप ठाकरे गाटाकडून करण्यात आला, तसेच ठाकरे गटाकडून किहोटो केसचा देखील उल्लेख केला गेला, “किहोटो केस सांगते अध्यक्षांच्या अधीकारात कोर्टाचा हस्तक्षेप नको” असे ठाकरे गटाकडून सांगण्यात आले आहे. नंतर सर्वोच्च न्यायालयात सर्व बाजूंचा युक्तीवाद पुर्ण झाला असून प्रकरण ७ जणांच्या घटनापीठाकडे जाणार का? निकाल राखून ठेवला आहे.

हे ही वाचा : 

महेश आहेर यांचं खळबळजनक वक्तव्य, ऑडिओ क्लिपमध्ये त्याने माझ्या हत्येची….

जितेंद्र आव्हाड यांनी एक विडिओ शेअर करत महेश आहेर यांच्यावर केले गंभीर आरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss