Friday, May 17, 2024

Latest Posts

राज्यात कोरोनाचा वाढता प्रभाव

रुग्णांची संख्या जरी कमी होत असली तरी ती झपाट्याने वाढत आहे.

मुंबईसह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. रुग्णांची संख्या जरी कमी होत असली तरी ती झपाट्याने वाढत आहे. मंगळवारी आकडा 2 हजार 956 होता तर त्यात आज 1 हजार संख्येने वाढ झाली आहे. ही संख्या पाहून चिंता वाढत चालली आहे. कोरोना रुग्ण वाढत असले तरीही कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही राज्यात आणि मुंबईत खूप वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमध्ये ओमायक्रोन या व्हायरस चे व्हेरिएंट आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये बाकी कोणताही व्हायरस दिसून येत नाही. अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपी यांनी दिली आहे. राज्यात शाळा सुरू झाल्यामुळे 12 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण झाले नसल्यास ते पूर्ण करून घेण्याच्या सूचना पालकांना आणि शिक्षकांना करण्यात आल्या आहेत.
खबरदारी म्हणून राज्यात टेस्टिंग चे प्रमाण वाढविण्यात आले आहे असेही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. कोरोना बूस्टर डोस घेतल्याने व्हेरिएंट विरुद्ध लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच तीन डोस घेतल्यानंतर फुफ्फुसातील संसर्गाचा धोका कमी होत आहे, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

Latest Posts

Don't Miss