Monday, May 20, 2024

Latest Posts

आरोप खोटे ठरल्यास मानहानीचा दावा करु; दादा भुसेंचा इशारा

ड्रग्स प्रकरणात असलेला ललित पाटील हा मुख्य आरोपी ससून रुग्णालयातून पळून गेला आहे. ड्रग्स प्रकरणात शेकडो कोटींची फसवणूक केलेल्या ललित पाटीलचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. पोलिसांकडून ललिताच्या भावाला अटक करण्यात आली आहे. याबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केला. त्यावर दादा भुसे यांनी मानहानीचा दावा करण्याबाबत इशारा दिला आहे.

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी कुठूनतरी ऐकून त्या माहितीच्या आधारे ललित पाटील प्रकणाबाबत आरोप केले आहेत. ड्रग्स माफिया ललित पाटील याला माझा पाठिंबा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पण या गोष्टीत काहीच तथ्य नसल्याचे मत राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी मांडले आहे. जे काही असेल ते चौकशीतून बाहेर येईलच, पण माझ्यावर केलेले आरोप खोटे ठरले, सिद्ध झाले नाही तर मी सुषमा अंधारे यांच्यावर मानहानीचा दावा करणार, असा इशारा दादा भुसे यांनी दिला आहे.

ड्रग्स प्रकरणात असलेला ललित पाटील हा मुख्य आरोपी ससून रुग्णालयातून पळून गेला आहे. ड्रग्स प्रकरणात शेकडो कोटींची फसवणूक केलेल्या ललित पाटीलचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. पोलिसांकडून ललिताच्या भावाला अटक करण्यात आली आहे. याबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केला. त्यावर दादा भुसे यांनी मानहानीचा दावा करण्याबाबत इशारा दिला आहे.

ड्रग्स रॅकेट प्रकरणातीळ मुख्य आरोपी ललित पाटील पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेत होता. काही दिवसांपूर्वी ललितने रुग्णालयातून पळ काढला आहे. या घटनेमुळे राजकीय आरोपांना सुरुवात झाली. यासाठी जबाबदार कोण? कोणाच्या मदतीने ललित पाटील पळून जाण्यात यशस्वी ठरला? यावरून चर्चा आणि आरोप करण्यात आले. त्यात पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर शिंदे गटातील एकाच्या मदतीने ललित पाटील पळून जाऊ शकला, असा आरोप केला. त्यामुळे सुषमा अंधारे यांनी अंदाज न लावता थेट नाव घेऊनच दादा भुसे यांच्यावर आरोप केले आणि त्यांचे कॉल रेकॉर्ड चेक करण्याची मागणी सुद्धा केली.

हे ही वाचा: 

ललित पाटीलला ‘त्यांचा’ पाठिंबा; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

कोमट पाण्यात मध मिसळून पिल्याने अनेक फायदे होतात, जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss