Uddhav Thackeray मतांसाठी लाचार, आज Balasaheb Thackeray असते तर… Devendra Fadnavis यांचे ताशेरे !

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (बुधवार, ८ मे) प्रसारमाध्यमांशी संवाद साधत शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा 'सुडो सेक्युलर' असा देखील उल्लेख केला.

Uddhav Thackeray मतांसाठी लाचार, आज Balasaheb Thackeray असते तर… Devendra Fadnavis यांचे ताशेरे !

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल (बुधवार, ८ मे) प्रसारमाध्यमांशी संवाद साधत शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी टीका करत ते म्हणाले, “मतांकरिता इतकी लाचारी उद्धव ठाकरे व त्यांच्या गटाच्या नेत्यांनी स्वीकारली आहे,आज बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असते तर त्यांनी यांना कधीच माफ केले नसते.” यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा ‘सुडो सेक्युलर’ असा देखील उल्लेख केला.

माध्यमांशी बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ही बदललेली शिवसेना तुम्ही बघा ही सुडो सर्कुलर झाली आहे. कालपर्यंत काय बोलत होते आणि आता काय बोलतात. मतांकरिता इतकी लाचारी उद्धव ठाकरे यांनी त्याच्या उबाटा गटाच्या नेत्यांनी याकरिता स्वीकारलेली आहे, बाळासाहेब ठाकरे यावेळी असते तर त्यांनी यांना कधीच माफ केले नसते.”

जिल्ह्यांच्या नामांतराविषयी बोलताना ते म्हणाले, “आमच्या सर्वांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे की महायुतीच्या सरकारने जो निर्णय घेतला होता, औरंगाबाद आणि उस्मानाबाद चे नामकरण छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव करणे त्याला केंद्र सरकारने तात्काळ मंजुरी देखील दिली होती. त्याच्या विरुद्ध जे काही याचिका होत्या त्या याचिका फेटाळला गेल्यात आणि आता हे पूर्णपणे छत्रपती संभाजीनगर आणि ते धाराशिव या ठिकाणी स्थापित झाले आहे. नामांतराचे मूळ स्वप्न हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे होते की या शहराचे नाव संभाजीनगर व्हायला हवे आणि छत्रपती संभाजी महाराज यांना मारणाऱ्या करोडो लोकांचे स्वप्न होते.”

मतदानाच्या टक्केवारीविषयी बोलताना फडणवीस म्हणाले, “प्रत्येक निवडणुकीमध्ये पहिल्या दिवशी ही प्रोव्हिजनल टक्केवारी येते आणि त्यानंतर दोन-तीन दिवसानंतर पूर्ण आकडेवारी येते याचे कारण आपण बघू शकतो ऊन खूप आहे त्यामुळे रात्री नऊ वाजेपर्यंत प्रत्येक बुथवर मतदान होत असते, आणि त्यांना सात वाजता आकडेवारी जाहीर करावी लागते, आणि त्यानंतर मग कालांतराने ती सगळी आकडेवारी समोर येते. मला असं वाटतं की आता याच्यावर आक्षेप घेणे ईव्हीएम वर आक्षेप घेतला आता हरल्यानंतर काय बोलायचे याची तयारी सुरू आहे आणि म्हणून हा आक्षेप घेतला जातोय.”

हे ही वाचा:

“कल्याण लोकसभेची जागा विक्रमी मतांनी निवडून येईल”; श्रीकांत शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

समाज व्यसनाधीन होईन अश्या भूमिकांनी……. अजित पवारांचा अमोल कोल्हेंवर निशाणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version