Monday, May 20, 2024

Latest Posts

समाज व्यसनाधीन होईन अश्या भूमिकांनी……. अजित पवारांचा अमोल कोल्हेंवर निशाणा

आज दुपारी शिरूर मध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. सभेदरम्यान अजित पवार अनेक विषयांवर बोलले. यात त्यांनी अमोल कोल्हे आणि रोहित पवारांवर देखील टीका केली. 'शिरूरमध्ये धरण आहे.

आज शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Aadhalrao Patil) यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी सभा घेतली. सभेदरम्यान अजित पवारांनी राष्ट्रवादीकॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शिरुरचे उमेदवार अमोल कोल्हे(Amol Kolhe) आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर निशाणा साधत टीका केली.

‘शिरूरमध्ये धरण आहे. पाणी आपल्या उशाशी आहे. मात्र काही जण पाणी पळवून नेण्याचा प्रयत्न करत आहेत. जुन्नर आणि आंबेगावाला जेवढी पाण्याची गरज आहे, तेवढंच ठेवा. वर बोगदा काढा आणि ओव्हर फ्लोचे पाणी घेऊन जा परंतु खाली बोगदा काढला तर उन्हाळ्यात आम्ही काय चुना लावत बोंबलत बसू का?’ असे म्हणत अजित पवारांनी रोहित पवारांवर टीका केली.

पुढे ते म्हणाले की, “अमोल कोल्हे शिवरायांची भूमिका करतात नंतर गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेची भूमिका करतात, समाज व्यसनाधीन होईन अश्या भूमिकांनी आपलं पोट भरू नये’. असा टोला अजित पवारांनी अमोल कोल्हें यांना लगावला याचबरोबर ‘ यशवंतराव चव्हाण यांनी शरद पवारांना वाढवलं मग यशवंतराव साहेबांच्या विचारधारेला सोडून ते गेलेच ना? असं म्हणत शरद पवारांवर नाव न घेता टीका केली.

 

काल बारामतीमध्ये निवडणूक पार पडली तेव्हा अजित पवारांनी आपल्या आईसोबत मतदानाचा हक्क बजावला. या बातमीची चर्चा झाली तेव्हा यावर अजित पवार म्हणले, ‘काल मी मतदानाला गेलो, ज्या आईच्या पोटी जन्म घेतला तिच्यासोबतच गेलो. बरं माझ्या आईला मी मतदानाला नाही नेणार तर कोण नेणार? अस पहिल्यांदा झालं नाही आहे. प्रत्येकवेळी माझी आई माझ्यासोबत मतदानाला येते. यांच्या पोटात आताच का दुखतं? ते म्हणाले दादा राजकारण करत आहेत. आता यात कसलं राजकारण आलं?’ असं ही ते म्हणाले.

हे ही वाचा:

लग्नाच्या पाच वर्षानंतर रणवीरने केले फोटो डिलीट ?; चाहता वर्ग नाराज

“बंजारा समाजाचे मत मलाच मिळणार”; पंकजा मुंडेची कथित ऑडियो क्लिप व्हायरल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss