नागपूर, पुण्यापाठोपाठ आता Saptshrungi Devi च्या दर्शनासाठी ड्रेस कोड?

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मंदिरावरून अनेक वाद हे होते आहेत. मंदिरात तोकडे कपडे घालावे कि नाही यावरून हा वाद सध्या सुरु आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी तुळजापूरच्या (Tuljapur) तुळजाभवानी मंदिरातील ड्रेसकोडच्या (Dress Code) फलकावरुन मोठा वाद निर्माण झाला होता.

नागपूर, पुण्यापाठोपाठ आता Saptshrungi Devi च्या दर्शनासाठी ड्रेस कोड?

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मंदिरावरून अनेक वाद हे होते आहेत. मंदिरात तोकडे कपडे घालावे कि नाही यावरून हा वाद सध्या सुरु आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी तुळजापूरच्या (Tuljapur) तुळजाभवानी मंदिरातील ड्रेसकोडच्या (Dress Code) फलकावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर काल महाराष्ट्र मंदिर महासंघाने एक मोठी घोषणा केली आहे. नागपुरातील (Nagpur) चार मंदिरांमध्ये वस्त्र संहिता म्हणजेच ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. तर त्यापाठोपाठ पुणे शहराच्या उपनगरातील वाघोली येथील वाघेश्वर मंदिरात देखील कपड्यांवर बंदी ही घालण्यात आली आहे. तर आता नाशिकच्या सप्तशृंगी गडावरील (Saptshrungi Gad) देखील ड्रेस कोड येणाची शक्यता ही होऊ शकते.

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सप्तशृंगी देवी मंदिर (Saptshurngi Devi Mandir) हे संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. या देवीच्या दर्शनासाठी अनेक भाविक हे येत असतात. तसेच वणी गडावर दर्शनासह इतरही अनेक पर्यटनस्थळे असल्यानं अनेक भाविक पर्यटनस्थळांना भेटी देत असतात. मात्र पर्यटनस्थळांबरोबरच धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी आलेले काही भाविक येताना तोकडे कपडे घालून येतात. परंतु आता नाशिकमधील सप्तशृंगी गडावरील (Saptshrungi Gad) आदिमायेच्या मंदिरातही पावित्र्य जपण्यासाठी भाविकांना ड्रेस कोड लागू व्हावा, यासाठी मागणी करण्यात आली आहे. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी देवी मंदिरात आता ड्रेस कोडचा निर्णय घेण्याच्या हालचाली सध्या सुरु झाल्या आहेत. याबाबत देवस्थान ट्रस्ट आणि वणी ग्रामस्थ सकारात्मक असून लवकरच याबाबत चर्चा करून हा निर्णय लागू केला जाणार आहे. त्यामुळे आता सप्तशृंगी देवी मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांना ड्रेसकोड आवश्यक असणार आहे.

नागपूर, पुणे, अमळनेर येथील काही मंदिरात भाविकांना ड्रेसकोड बंधनकारक करण्यात आलेला आहे. यानुसार दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी तोकडे, अंगप्रदर्शन करणारी अथवा उत्तेजक कपडे परिधान केल्यास त्यांना दर्शन घेता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मंदिर प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. तसेच या मंदिरात जाताना शॉर्ट कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. महिलांना वन पीस, शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट पॅन्ट घालून मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. तर महिलांप्रमाणे पुरुषांना देखील हे नियम लागू होणार आहेत. याच धर्तीवर सप्तशृंगी मंदिरात यावर विचार सुरु आहे.

हे ही वाचा:

Arvind Kejriwal आले विरोधकांना जोडण्यासाठी, आज घेणार शरद पवारांची भेट

पुण्यात टिंबर मार्केटमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी

अवघ्या काही तासांत लागणार HSC चा निकाल, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version