spot_img
Sunday, December 15, 2024
spot_img

Latest Posts

पॉर्न वरून राजकारण तापले, Chitra Wagh यांच्या आरोपांवर Kiran Mane यांचे सडेतोड उत्तर

सध्या पॉर्न या विषयावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी शिवसेना उबाठा पक्षाच्या (Shivsena UBT) जाहिरातींवरून आक्रमक भूमिका घेतली. चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत उबाठा गटाच्या महिला अत्याचारविरोधक जाहिरातींमधेच पॉर्न कलाकाराला घेतल्याचे आरोप शिवसेना उबाठा गटावर केले होते. आता यावरून राजकीय वातावरण गरम झाले असतानाच, अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनीही या वादात उडी घेतली आहे.

किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिले आहे. या व्हिडियोमधून किरण माने म्हणतात, “भाजपच्या नेत्यांना मूळ मुद्द्यांपासून भरकटवायचं असत. लोक जगण्याशी निगडित प्रश्न आता विचारू लागले आहेत. मग कुठल्यातरी नेत्याला पिन मारायची. तू काहीतरी विधान कर अन बोलत बसू दे त्यांना… जर भारतात पॉर्न बनत आहे, असे चित्र वाघ यांचं म्हणणं आहे. भारतात पॉर्न फिल्म्स बॅन असतानादेखील त्या बनत असतील तर हे सरकारच गृह मंत्रालयाचं फार मोठं अपयश आहे. त्यामुळे जनतेनं मतदान करताना हे लक्षात ठेवायला हवं.”

पुढे ते म्हणाले, “महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार झाले, तिकडे दुर्लक्ष केले गेलं. आपल्या सात कुस्तीपटू महिला सांगत होत्या. आमच्यावार लैंगिक शोषण होत आहे. तिकडेही दुर्लक्ष केलं. कालच त्यांचा एक नेता ३ हजार महिलांवर अत्याचार करून पळून गेलाय. जो त्यांच्या स्टेजवर वावरत होता. आता चित्राताईंनी गौप्य्स्फोट केला कि भारतात पॉर्न फिल्म बनतात. तिथे लहान मुलींचा वापर केला जातो. त्यामुळे, चित्राताईंचे खूप आभार. लोकांनो मतदान करताना हे हि लक्षात ठेला. भारतात सध्या हे हि चालतं जे पूर्वी चालत नव्हतं.”

महाराष्ट्राच्या राजकारणातील हे ‘पॉर्न’ प्रकरण आता चांगलेच रंगले आहे. चित्रा वाघ यांच्या अंगलट आले आहे. त्यांनी आक्षेप घेतलेल्या जाहिरातीमधील अभिनेत्यानेसुद्धा पुढे येऊन चित्रा वाघ यांना माफी मागण्यांचे अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

हे ही वाचा:

BJP ने वॉशिंग मशीन चिन्हावर निवडणूक लढवावी, Congress प्रवक्ते Sachin Sawant यांचा हल्लाबोल

“वाघ” कोण हे ४ जूनला कळेल; Sanjay Raut यांचा विश्वजित कदमांना खोचक टोला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss