Saturday, July 27, 2024

Latest Posts

सुप्रिया ताई या जन्माने आणि रक्ताने पवार;शर्मिला पवार

मी नणंदेची जागा कधीही घेणार नाही. आम्ही बाहेरच्या आहोतच.शर्मिला ठाकरे यांचं वक्तव्य.

आज बारामती येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार, बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, शर्मिला पवार तसेच पवार कुटुंबियातील अनेक सदस्य या मेळाव्याला उपस्थित होते. त्यावळी श्रीनिवास पवार यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनी “मूळ डीएनए जो पवारांचा आहे तो सुप्रिया सुळे यांच्यामध्येच आहे” असं वक्तव्य करत विरोधकांसह अजित पवारांवर निशाणा साधला.

काही दिवसांपूर्वी “मूळ पवार आणि बाहेरुन आलेले पवार” शरद पवारांचे हे वक्तव्य चर्चेत आलं होतं. बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार यांना विजयी करण्याचे आवाहन करताना चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे असा मुद्दा मांडताना अजित पवार दिसून येत आहेत.

गेले काही दिवस अजित पवार हे सातत्याने सभांमधून शरद पवारांच्या टीकेला उत्तर देत आहेत. मात्र अजित पवार यांंच्या”लेकीच्या प्रेमापोटी सुना बाहेरच्या वाटतात का”या टीकेला सख्ख्या भावजयीनेच चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या, “मूळ पवार कोण? या साहेबांच्या वक्तव्यावर बोलण्याइतपत मी मोठी नाही. सुप्रिया ताई या जन्माने आणि रक्ताने पवार आहेत.आम्ही पवारांच्या सुना त्यांच्या लेकाशी लग्न करुन पवार कुटुंबात आलो आहोत. मी पवारांची सून आहे याचा मला अभिमान आहे परंतु, मी नणंदेची जागा कधीही घेणार नाही. आम्ही बाहेरच्या आहोतच. मूळ डीएनए जो पवारांचा आहे तो सुप्रिया सुळे यांच्यामध्येच आहे, त्यामुळे जे वाक्य वापरले गेले ते काही चुकीचे नाही असे मी मानते”.

“कुटुंबात आपल्याला एकटं पाडलं जातंय, तुम्ही साथ द्या अशी भावनिक साद या आधी अजित पवारांनी बारामतीकरांना घातली होती. त्यानंतर अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनीही अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेत सुप्रिया सुळेंचा प्रचार सुरू केला. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी पवार कुटुंबियांनी चांगलीच कंबर कसली आहे.

दरम्यान, शर्मिला पवार या अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास यांच्या पत्नी आहेत. त्या शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा देखील आहेत. इंदापूर व बारामती तालुक्यात या फाउंडेशनने सामाजिक काम केले आहे.सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी आई प्रतिभा पवार आणि वहिणी शर्मिला पवार सातत्याने पाठीशी उभ्या आहेत.

Latest Posts

Don't Miss