Thursday, May 16, 2024

Latest Posts

अखेर MAHAVIKAS AGHADI चा प्रश्न मार्गी लागणार, कधी मिळणार उत्तर?

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणारा महाविकास आघाडीचा (MAHAVIKAS AGHADI) प्रश्न आता सुटला आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपावरून अनेक चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु होत्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाचा तिढा आता सुटला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून कोणता पक्ष कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार, याबाबतचा निर्णय आता पक्का झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार (SHARAD PAWAR), ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (UDDHAV THACKERAY) तसेच नाना पटोले (NANA PATOLE) यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात अंतिम निर्णय सांगितला जाणार आहे. ९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ११ वाजता तिन्ही पक्षांची संयुक्तरित्या पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली असून यात अंतिम फॉर्म्युला जाहीर करण्यात येणार आहे.

महाविकास आघाडी (MAHAVIKAS AGHADI) बद्दल मागील अनेक दिवसांपासून वेगवेगळे तर्क-वितर्क लावण्यात येत होते. त्यानंतर आता पत्रकार परिषदेची तारीख जाहीर झाल्यामुळे महाविकास आघाडी (MAHAVIKAS AGHADI) च्या जागावाटपाचा प्रश्न आता सुटणार आहे. मुंबई (MUMBAI) येथील मंत्रालय परिसरात ठाकरे गटाच्या पक्ष कार्यालयात संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषेदत शरद पवार (SHARAD PAWAR), उद्धव ठाकरे (UDDHAV THACKERAY) यांच्यासह संजय राऊत (SANJAY RAUT), जयंत पाटील (JAYANT PATIL) तसेच बाळासाहेब थोरात (BALASAHEB THORAT) यांची उपस्थिती लाभणार आहे. यावेळी महाविकास आघाडी (MAHAVIKAS AGHADI) बाबत असलेल्या जागावाटपाच्या मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे. यामध्ये सांगली (SANGLI), मुंबई (MUMBAI) तसेच भिवंडी (BHIWANDI) येथील जागांसह इतर राहिलेल्या जागांवर कोणता घटक पक्ष निवडणुकीत आपला उमेदवार उतरवणार, याची माहिती आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत दिली जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आता सर्वच पक्षाच्या नेत्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. परंतु, जागावाटपावरून काही ठिकाणी महाविकास आघाडी (MAHAVIKAS AGHADI) मधील मित्रपक्ष तसेच महायुतीमधील मित्रपक्ष यांच्यामध्ये वाद कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच पक्षातील नेत्यांचे दुसऱ्या  पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊटगोइंग चालूच आहे. त्यात आता पत्रकार परिषदेमुळे महाविकास आघाडी (MAHAVIKAS AGHADI) बाबत आता तोडगा निघणार असल्याची चिन्हं दिसून येत आहेत.

हे ही वाचा:

MNS ला मोठा धक्का! Ashish Shelar यांच्या उपस्थितीत तब्बल ‘इतके’ पदाधिकारी, कार्यकर्ते करणार BJP मध्ये प्रवेश

Congress ची VBA ला नवी ऑफर, Prakash Ambedkar यांना देणार राज्यसभा खासदारकी, केंद्रीय मंत्रिपद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss