कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, Goa प्रवास होणार हायस्पीड, ‘या’ तारखे पासून धावणार Vande Bharat Express!

वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) आता कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे. अखेर कोकण रेल्वे मार्गावरील पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसला मुहूर्त मिळाला आहे.

कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, Goa प्रवास होणार हायस्पीड, ‘या’ तारखे पासून धावणार Vande Bharat Express!

वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) आता कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे. अखेर कोकण रेल्वे मार्गावरील पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसला मुहूर्त मिळाला आहे. येत्या शनिवारी म्हणजेच ३ जून ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मडगाव-मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तसेच ५ जून पासून वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांच्या सेवे साठी उपलब्ध होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसला रत्नागिरी आणि खेड या स्थानकांवर स्टॉप दिला आहे.

चौथी वंदे भारत एक्सप्रेस आता मुंबईकरांना मिळणार आहे. येत्या ३ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी मडगाव स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर एकवरून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सकाळी ठीक साडेदहा वाजता वंदे भारत एक्सप्रेस ला हिरवा कंदील दाखवणार आहेत. सध्या मुंबईहून मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या वंदे भारत एक्सप्रेस सुटतात. परंतु शिर्डीला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ला नाशिकपर्यंतच प्रतिसाद मिळतो. तर सोलापूर ला जाणाऱ्या एक्सप्रेसला पुण्यापर्यंतच प्रतिसाद मिळतो. याचे मुख्य कारण म्हणजे वंदे भारत एक्सप्रेस चे महागडे दर. मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसच्या साधारण तिकीटाचे दर ९७५ रुपये (Chair Class) आणि एक्झिक्युटीव्ह क्लासचे (Executive Class) तिकीट १,८४० रुपये इतके आहे. तर मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसच्या साधारण तिकीटाचे दर १,३०० रुपये आणि एक्झिक्युटीव्ह क्लासचे तिकीट २,३६५ रुपये इतके आहे. वंदे भारत एक्सप्रेस चे दर हे सामन्यांना परवडणारे नाही असे आहेत. ही रेल्वे प्रवाशांसाठी गंभीर समस्या आहे.

वंदे भारत एक्सप्रेस ची वेळ आणि थांबे पुढील प्रमाणे आहेत –

मडगाव-मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस कोकणवासियांना मोठा फायदा होणार आहे. मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस चालवण्याचे रेल्वे प्रशासनाचे नियोजन आहे. सध्या दिलेल्या प्रस्तावानुसार, सीएसएमटी वरून सकाळी ५:३५ ला एक्सप्रेस सुटेल, तर मडगाव येथे दुपारी१:१५ वाजता वंदे भारत एक्सप्रेस पोहोचेल. त्यानंतर लगेच मडगाव वरुन तीच वंदे भारत दुपारी २:३५ वाजता मुंबईकडे रवाना होईल आणि रात्री १०:२५ वाजता एक्सप्रेस मुंबई सीएसएमटीला पोहोचेल. वंदे भारत एक्सप्रेस फक्त ७ तास ५० मिनटात सीएसएमटी ते मडगाव हे अंतर कापणार आहे. या मुळे चाकरमान्यांना प्रचंड फायदा होणार आहे.

हे ही वाचा:

देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंनंतर घेतली एकनाथ शिंदेची भेट

महापुरुषांवर गरळ ओकनाऱ्यांवर वेळीच कारवाई झाली पाहिजे, अजित पवार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version