विद्यार्थ्यांसाठी खुशखबर!, २ जून ला जाहीर होणार SSC निकाल, या वेबसाइटवर मिळेल संपूर्ण माहिती

आता दहावीच्या निकालाबाबतची देखील महत्वाची अपडेट ही समोर आली आहे. उद्या दिनांक २ जुन रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल हा ऑनलाईन पद्धतीने लागणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर!, २ जून ला जाहीर होणार SSC निकाल, या वेबसाइटवर मिळेल संपूर्ण माहिती

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल काही लागणार याची उत्सुकता विद्यार्थ्यासोबत त्यांच्या पालकांना देखील लागली होती. नुकतीच काही दिवसांपूर्वी बारावीचा निकाल हा जाहीर झाला होता. आणि नुकताच आता दहावीच्या निकालाबाबतची देखील महत्वाची अपडेट ही समोर आली आहे. उद्या दिनांक २ जुन रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल हा ऑनलाईन पद्धतीने लागणार आहे.

उद्या सकाळी ११ वाजता पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाईल. यावेळी शिक्षण विभागाकडून राज्यातील निकालाची टक्केवारी जाहीर केली जाईल. त्यानंतर दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे राज्यभरातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकाचं लक्ष लागलं आहे. राज्य मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यात ८ लाख ४४ हजार ११६ मुले आणि ७ हजार ३३ हजार ०६७ मुलींचा समावेश होता.राज्यभरातील ५ हजार ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती.

निकाल कुठे चेक कराल?

http://mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

http://ssc.mahresults.org.in

असा करा निकाल चेक –

हे ही वाचा:

खुशखबर!, LPG Gas Cylinder च्या दरात मोठी कपात, पाहा Latest Rates

Nitin Gadkari म्हणाले, ‘मंदिरांमध्ये स्वच्छतेचा अभाव आहे, मी…’

संजय शिरसाट यांना पोलिसांकडून दिलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version