Tuesday, May 21, 2024

Latest Posts

मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्रासाठी RAJ THACKERAY मैदानात उतरणार

गुढी पाडव्याच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शवला आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणात एक वेगळं चित्र दिसून आले

महायुतीकडून अनेक जागांचा तिढा सुटला आहे. ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंंनी (Eknath shinde) आपल्या दावेदार लोकसभेच्या निवडणुकीत उतरवले आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिंदेंचे निकटवर्तीय नरेश म्हस्के (Naresh Mhaske)उभे आहेत तर कल्याण लोकसभा मतदारसंघात सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikantshinde) यांना रिंगणात उभे आहेत. ठाणे आणि कल्याण लोकसभेचे उमेदवारांची नावे घोषित होताच त्यांनी शिवतीर्थ येथे जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली.

“आज नरेश म्हस्के आणि माझी उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर झाली. त्यानंतर राज ठाकरेंचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही त्यांची भेट घेतली त्यांनी आम्हाला भरभरुन आशीर्वादही दिला. येणाऱ्या काळात ठाणे आणि कल्याण लोकसभेसाठी त्यांची सभा देखील होईल, त्यांचं सहाकार्य पहिल्यापासून आहे, प्रेम आहे”.असे खा.श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

गुढी पाडव्याच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शवला आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणात एक वेगळं चित्र दिसून आले. राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला. त्यानंतर आज
श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के राज ठाकरेंची भेट घेत त्यांना कल्याण आणि ठाणे मतदारसंघात सभा घेण्याचा आग्रह केला. त्यामुळे आजच्या या भेटीनंतर आता राज ठाकरेंनी नेमकं किती सभा घ्यायच्या हे मनसे ठरवेल. राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर एकदा ही मनसे आणि राज ठाकरे हे मैदानात उतरले नाही आहेत.त्यातच महायुतीचे रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी पहिल्यांदा राज ठाकरे रत्नागिरीत सभा घेणार आहे.

येत्या ४ मे ला नारायण राणेंसाठी येत्या संध्याकाळी पाच वाजता राज ठाकरेंची कणकवलीत सभा होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे, आता राज ठाकरे कल्याणमध्ये देखील मुख्यमंत्री यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्यासाठी मैदानात उतरतील अशी चर्चा रंगली आहे. राज ठाकरे यांच्या भाषणामुळे त्यांचा चाहतावर्ग मोठ्याप्रमाणात असल्याचा याचा फायदा महायुतीला होईल असे चित्र दिसत आहे.

हे ही वाचा:

अखेर ठरलं! उत्तर पश्चिममधून वायकरांना उमेदवारी जाहीर

‘यांचं’ स्वतःच कर्तृत्व काहीच नाही, Girish Mahajan यांची MVA वर जोरदार टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss