Friday, April 26, 2024

Latest Posts

खुशखबर!, LPG Gas Cylinder च्या दरात मोठी कपात, पाहा Latest Rates

आताच्या घडीची सर्वात महत्वाची आणि त्याचसोबत आनंदाची बातमी समोर आली आहे. एलपीजी गॅसच्या किमतींत (LPG Gas Cylinder Price) आता मोठी घट झाली आहे.

आताच्या घडीची सर्वात महत्वाची आणि त्याचसोबत आनंदाची बातमी समोर आली आहे. एलपीजी गॅसच्या किमतींत (LPG Gas Cylinder Price) आता मोठी घट झाली आहे. एलपीजी (LPG) विकणाऱ्या कंपन्यांनी नुकतेच दर स्वस्त केले आहेत. महिन्याच्या पहिल्याच दिवशी अर्थात १ जूनला हि मोठी खुशखबर आहे. ही कपात करत तेल कंपन्यांनी ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.

व्यावसायिक एलपीजी गॅसच्या किमतीतही (Commercial LPG Cylinder) कपात झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी (OMCs) जाहीर केलेल्या किमतीनुसार, कमर्शिअल गॅस सिलिंडर तब्बल ८३ रुपयांनी स्वस्त झाले आहे. यामुळे आता १९ किलोच्या कमर्शिअल एलपीजी गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांना १७७३ रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी हे सिलिंडर १८५६.५० रुपयांना मिळत होते. मात्र, घरगुती गॅस सिलिंडर पूर्वीच्यात दरात मिळणार आहे. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

तसेच जर मुंबईमधील दाराच्या बाबतीत पहिले तर, मुंबईत १९ किलो व्यावसायिक गॅस सिलेंडर १७२५ रुपयांना विकला जात आहे. तर दुसरीकडे चेन्नईमध्ये एलपीजीची किंमत १९७३ रुपये आहे. दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलेंडर १८५६.५० रुपयांवरून ८३.५० रुपयांनी कमी होऊन १७७३ रुपयांनी विकला जात आहे. तर कोलकातामध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत १९६०.५० रुपयांवरून १८७५.५० रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅसचा दर १८५६.५० रुपये प्रति सिलेंडर होता. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलेंडरचा दर ११०३ रुपयांवर कायम आहे. कमर्शिअल एलपीजी स‍िलिंडरच्या बाबतीत दिल्यासा देण्या बरोबरच, तेल कंपन्यांनी जेट फ्यूअलच्या किंमतीतही कपात केली आहे. ही किंमत जवळपास ६,६०० रुपयांनी कमी झाली आहे. येणाऱ्या काळात याचा परिणाम विमान प्रवासावरही होऊ शकतो. हे नवे दर 1 जूनपासून लागू करण्यात आले आहेत. तसेच तेल कंपन्यांनी घरगुती LPG स‍िलिंडरच्या किंमतीत कसल्याही प्रकारचा बदल केलेला नाही.

हे ही वाचा:

Coconut Water Face Spray ने करा नियमित Skin Care, त्वचा ही उजळेल…

South Actor Harish Pengan यांनी वयाच्या ४९ वर्षी घेतला अखेरचा श्वास

संजय शिरसाट यांना पोलिसांकडून दिलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss