संविधानावर दरोडा घालू पहाणाऱ्या टोळीतला निकम्मा नाग, Kiran Mane यांचा Ujjwal Nikam यांच्यावर घणाघात

अभिनेते किरण माने यांनी आपल्या 'X' अकाऊंटवरून पोस्ट करत , उज्ज्वल निकम यांच्यावर निशाणा साधला आहे. उज्ज्वल निकम यांचा उल्लेख 'निकम्मा नाग' असा करत त्यांच्यावर टीका केली आहे.

संविधानावर दरोडा घालू पहाणाऱ्या टोळीतला निकम्मा नाग, Kiran Mane यांचा Ujjwal Nikam यांच्यावर घणाघात

भाजपकडून (BJP) काल (शनिवार, २० एप्रिल) ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून (Mumbai North Central Loksabha Constituency) उमेदवारी देण्यात आली. या मतदारसंघाच्या विद्यमान खासदार पूनम महाजन (Poonam Mahajan) यांना डावलून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) काँग्रेसच्या (Congress) वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून याअगोदर उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे, या मतदारसंघात थेट भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत पाहायला मिळणार आहे. अश्यातच, अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी आपल्या ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट करत, उज्ज्वल निकम यांच्यावर निशाणा साधला आहे. उज्ज्वल निकम यांचा उल्लेख ‘निकम्मा नाग’ असा करत त्यांच्यावर टीका केली आहे.

किरण माने यांनी आपल्या ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट करत म्हंटले, “महाराष्ट्रातल्या दोन पक्षांवर दरोडे पडले तेव्हा न्यूज चॅनल्स याच विद्वान वकिलाकडून एक्सपर्ट ओपिनियन घेत होते. हा भामटा पटवून देत होता की हे दरोडे कसे कायदेशीर आहेत. आत्ता समोर आला हा संविधानावर दरोडा घालू पहाणाऱ्या टोळीला सामील झालेला #निकम्मा नाग.” किरण माने यांच्या पोस्टमुळे समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. ट्विटरवर सुमारे ३० हजारांहून अधिक लोकांनी ही पोस्ट पाहिली असून त्यावर २ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

किरण माने हे प्रसिद्ध अभिनेते असून मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून त्यांनी आपला अभिनयाचा ठसा उमटवला आहे. समाजमाध्यमांवर आपली मते मांडण्यामुळेही ते ओळखले जातात. समाजमाध्यमांवर ते सतत आपली राजकीय मते आणि सामाजिक मते मांडत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे आता ते राजकारणातही सक्रिय झाले आहेत. किरण माने यांची ट्विटर पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरला असून लोक याविषयी आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

हे ही वाचा:

PM Narendra Modi यांच्या दौऱ्यानिमित्त “या” शहरात ड्रोन वापरण्यास बंदी

सरकार बनवा आणि नोट कमवा हेच विरोधकांचे उद्दिष्ट: PM Narendra Modi

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version