Thursday, May 9, 2024

Latest Posts

सरकार बनवा आणि नोट कमवा हेच विरोधकांचे उद्दिष्ट: PM Narendra Modi

आज (शनिवार, २७ एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील माने (Dhairyashil Mane) यांच्या प्रचारार्थ कोल्हापूरात जाहीर सभा पार पडल्या. नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरुवात ही मराठी भाषेतून केली. यावेळी त्यांनी “जगात भारी, कोल्हापुरी” असे वक्तव्य केले. यावेळी बोलताना जय भवानी, जय शिवाजी ची घोषणा करत नरेंद्र मोदी म्हणाले, “करवीर निवासीनी अंबाबाई देवीला वंदन करतो. तमाम कोल्हापूरकरांना माझा नमस्कार. कोल्हापूर हि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाची धर्ती आहे. मी काशीचा खासदार आहे. आज करवीर काशी मध्ये आहे. कोल्हापूर हे फूटबॉलचं हब आहे. म्हणून जगात भारी कोल्हापूरी!”

मोदींनी भाषणादरम्यान इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “कॉंग्रेस आणि इंडिया आघाडीने देशविरोधात काम केले आहे. ही निवडणूक विकसित भारताची आहे. काश्मीर मध्ये ३७० पुन्हा आणणार असा कॉंग्रेसचा अजेंडा आहे. इंडिया आघाडीवाले सरकारच्या दरवाजे पर्यंत पोहचू तरी शकतात का ? लोकसभा निवडणुकीच्या पुढच्या चारही टप्प्यात विरोधक चारीमुंड्या चित होणार. इंडिया आघाडीने सामाजिक न्यायाची हत्या करण्याचं ठरवलं आहे. पंतप्रधानासाठी इंडिया आघाडीचा नवा फॉर्म्युला आहे. विरोधकांनी राम मंदिराचं निमंत्रण स्विकारलं नाही. कॉंग्रेसला योग्य ते उत्तर मिळालं पाहिजे. सनातन धर्माला विरोध करणाऱ्यांचे इंडिया आघाडी स्वागत करते. नकली शिवसेना या सगळ्यांसोबत खांद्याला खांदा लावून काम करत आहे. आज बाळासाहेब असते तर,त्यांना दु:ख झालं असते. बाबासाहेब आंबेडकरांचे अपमान करणारं हे कॉंग्रेस आहे. कॉंग्रेस महाराष्ट्रात कर्नाटक मॉडेल लागू करण्याचा विचार करत आहे. दलितांचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटण्याच्या प्रयत्नात आहे. सरकार बनवा आणि नोट कमवा हा एकच अजेंडा कॉंग्रेस आणि इंडिया आघाडीचा आहे.”

यावेळी कोल्हापूरकरांसाठी कोल्हापूर – वैभववाडी रेल्वेला मंजुरी दिली असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “मुद्रा योजनेअंतर्गत १० लाख ऐवजी २० लाख रुपयाचं लोन देणार. महिलांची सुरक्षा ही मोदीची गॅरंटी आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचे महायुती सरकार कोल्हापूराच्या विकासासाठी काम करत आहे.” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

मुस्लिम समाजासाठी नसीम खान प्रचंड आक्रमक; कॉंग्रेसमध्ये दलाल घुसल्याचा आरोप

मोदी सरकारचे शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट ! कांदा निर्यातबंदी हटवण्याचा घेतला मोठा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss