Sunday, May 12, 2024

Latest Posts

PM Narendra Modi यांच्या दौऱ्यानिमित्त “या” शहरात ड्रोन वापरण्यास बंदी

मोदींच्या दौऱ्यानिमित्त शहरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात येत असून पुढील दोन दिवस ड्रोन वापरण्यास मनाई असल्याचे आदेश सहपोलिस आयुक्त प्रविण पवार यांनी दिले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi )यांचा महाराष्ट्र दौरा सुरु झाला आहे. काल (२७ एप्रिल) रोजी झालेल्या कोल्हापूर दौऱ्यानंतर  सोमवारी (२९ एप्रिल) रोजी मोदी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मोदींच्या दौऱ्यानिमित्त शहरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात येत असून पुढील दोन दिवस ड्रोन, हलकी विमाने (लाइट एअर क्राफ्ट) वापरण्यास सक्त मनाई करण्यात येत असल्याचे आदेश पुणे सहपोलिस आयुक्त प्रविण पवार यांनी दिले आहेत.

पंतप्रधान पुणे दौऱ्यावर येणार आहेत. सोमवारी (२९ एप्रिल) लष्कर भागातील रेसकोर्स येथे मोदींची सभा होणार आहे तर मंगळवारी (३० एप्रिल) मोदी सोलापूरला जाणार आहेत. संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्ताचे आदेश दिले आहेत. रेसकोर्स मैदान आणि शिवाजीनगर येथे हॅलीपेड तयार करण्यात येणार आहे त्यामुळे रविवारी मध्यरात्रीपासून पुढील दोन दिवस ड्रोन वापरण्यास मनाई आहे. पोलिसांव्यतिरिक्त इतर कोणत्याही संस्थांना ड्रोन कॅमेरा वापरण्यात येणार नाही. जर ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करायचा असेल तर विशेष शाखेच्या पोलिस आयुक्तांची परवानगी घेणे बंधनकारक असेल. विनापरवानगी कॅमेऱ्याचा वापर केल्यास योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त प्रविण पवार यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

“शिवरायांच्या गादी पुढे मोदी कोणीच नाही”;SANJAY RAUT यांचा PM NARENDRA MODI यांच्यावर निशाणा

PM NARENDRA MODI यांची आज कोल्हापूरात तोफ धडकणार;उमेदवाराच्या प्रचारार्थ मोदींची सभा 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss